Reliance Jio IPO When will Mukesh Ambani bring the country s biggest IPO big update See full details
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 8:45 AM1 / 9Reliance Jio IPO : अनेक जण मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या प्रतीक्षेत आहेत. आता यासंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. रिलायन्स जिओचा आयपीओ २०२५ मध्ये लिस्ट करण्याचं टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती समोर आलीये. तज्ज्ञांच्या मते याचं मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.2 / 9दरम्यान, यानंतर दीर्घकाळानं आपल्या रिटेल युनिटचा आयपीओ आणण्याचा विचार असल्याचीही माहिती समोर आलीये. या प्रकरणाशी संबंधित दोन जणांनी न्यूज एजन्सी रॉयटर्सला यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी २०१९ मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ येत्या ५ वर्षांमध्ये लिस्टिंगच्या दिशेनं पुढे जाणार असल्याचं म्हटलं होतं. 3 / 9दरम्यान, मुकेश अंबानी यांनी केकेआर, जनरल अटलांटिक आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी सारख्या कंपन्यांकडून डिजिटल, टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायात एकत्रितपणे २५ अब्ज डॉलर्स उभे केले आहेत. दोन्ही सूत्रांनी सांगितलं की, रिलायन्सनं आता रिलायन्स जिओचा आयपीओ २०२५ मध्ये लाँच करण्याची योजना आखली आहे. कंपनी ४७.९ कोटी ग्राहकांसह भारतातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी झाली आहे. तसंच कंपनीनं एक स्टेबल बिझनेस आणि महसूल मिळवला असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.4 / 9रिटेल व्यवसायाचा आयपीओ २०२५ पर्यंत येण्याची शक्यता नाही, कारण कंपनीला आधी काही अंतर्गत व्यवसाय आणि ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागेल, असं सूत्रांनी सांगितलं. इलॉन मस्क यांनी आपली स्टारलिंक इंटरनेट सेवा भारतात सुरू केल्यास रिलायन्स जिओ त्यांना टक्कर देण्यास तयार आहे. गुगल आणि मेटाचा ही पाठिंबा असलेल्या जिओने एआय इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी एनव्हीडियासोबत भागीदारी केली आहे. 5 / 9सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओच्या मूल्यांकनाबाबत अद्याप कोणताही अंतर्गत निर्णय झालेला नाही आणि बँकर्सची नेमणूक झालेली नाही. परंतु जुलैमध्ये जेफरीजनं कंपनीचं अंदाजित आयपीओ मूल्यांकन ११२ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.6 / 9२०२५ चा जिओ आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बनवण्याचं रिलायन्सचं उद्दिष्ट असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ह्युंदाई इंडियाचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे, जो नुकताच लाँच करण्यात आला. आयपीओच्या वेळेत अजूनही बदल होऊ शकतो, असं दोन्ही सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. 7 / 9भारतीय बाजारांनी अलीकडेच विक्रमी उच्चांक गाठला असून ऑक्टोबरपर्यंत २७० कंपन्यांनी या वर्षी भारतीय आयपीओमधून १२.५८ अब्ज डॉलर्स उभे केले आहेत, जे २०२३ मध्ये ७.४२ अब्ज डॉलर्स होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सचा जिओसह रिटेल युनिट लिस्ट करू नये असा विचार आहे. कारण त्याला एकाच वेळी दोन मोठे आयपीओ घेऊन बाजारात एन्ट्री करायचा नाही. 8 / 9फॅशन, ग्रोसरी आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्सचा समावेश असलेल्या रिलायन्स रिटेलच्या व्यवसायानं अलीकडच्या वर्षांत अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी ई-कॉमर्समध्ये प्रवेश केला आहे. आता क्विक कॉमर्स व्यवसायाचा फायदा घेण्यासाठी ते आता फास्टर डिलिव्हरीचा विस्तार करत आहेत. याअंतर्गत १० मिनिटांत प्रॉडक्ट्स डिलिव्हरी केली जात आहे. 9 / 9अलीकडच्या काळात १७.८४ अब्ज डॉलर्स जमवल्यानंतर जिओ प्लॅटफॉर्मची मालकी ३३ टक्के परदेशी गुंतवणूकदारांकडे आहे. याच कालावधीत रिलायन्स रिटेलनं परदेशी गुंतवणूकदारांना सुमारे १२ टक्के हिस्सा विकून ७.४४ अब्ज डॉलर्स उभे केले. (टीप : यामध्ये सामान्य माहिती देम्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications