reliance Jio To Launch Cheapest 5g Smartphone In India See Price And Details
जिओ सर्वात मोठा धमाका करण्याच्या तयारीत; प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढली By कुणाल गवाणकर | Published: October 19, 2020 7:58 AM1 / 12जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात आणि जिओ फायबरच्या माध्यमातून ब्रॉडबँड क्षेत्रात मोठा धमाका केल्यानंतर आता रिलायन्सनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.2 / 12रिलायन्सच्या जिओमुळे इंटरनेटचे दर खाली आले. जिओशी स्पर्धा करण्यासाठी इतर कंपन्यांनाही दर कमी करावे लागले. याचा मोठा फायदा ग्राहकांना झाला.3 / 12जिओच्या माध्यमातून भारतीयांना स्वस्तात ४जी इंटरनेट उपलब्ध करून दिल्यानंतर आता रिलायन्सनं ५ जीची तयारी सुरू केली आहे.4 / 12रिलायन्सनं ४ जीची सुविधा असलेले अतिशय किफायतशीर फोन बाजारात आणले. तशीच तयारी त्यांनी ५ जीसाठी सुरू केली आहे.5 / 12रिलायन्सच्या ५ जी फोनची किंमत ५ हजारांपेक्षा कमी असेल. रिलायन्स जिओ यामध्ये यशस्वी झाल्यास टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजेल.6 / 12५ जी फोनची किंमत सुरुवातीला ५ हजार रुपये असेल. त्यानंतर मागणी आणि विक्री लक्षात घेऊन ती २,५०० किंवा ३,००० रुपयांपर्यंत आणली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.7 / 12२० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवून कंपनी ५ जी स्मार्टफोनच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.8 / 12सध्या २ जी फोन वापरणाऱ्या ग्राहकांना ५ जी सुविधा उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य रिलायन्सनं ठेवलं आहे. त्यामुळेच त्यांना स्वस्तात ५ जी स्मार्टफोन्स देण्याची तयारी रिलायन्स जिओनं केली आहे.9 / 12सध्याच्या घडीला देशात ५ जी स्मार्टफोन्सची किंमत अतिशय जास्त आहे. भारतात अद्याप ५ जी नेटवर्क सुरू झालेलं नाही.10 / 12तंत्रज्ञान क्षेत्रातली अमेरिकन कंपनी रिलायन्ससोबत स्वस्त एँड्रॉईड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करेल, असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींनी ४३ व्या सर्वसाधारण सभेत म्हटलं होतं.11 / 12मुकेश अंबानींनी केलेली घोषणा पाहता रिलायन्स ५ जी स्मार्टफोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी मायक्रोसॉफ्टची मदत घेईल, असं मानलं जात आहे.12 / 12रिलायन्सनं केंद्र सरकारकडे ५ जी नेटवर्कच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप तरी रिलायन्सला परवानगी मिळालेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications