शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance Jio Tariff Hike: जिओनं वाढवलं युझर्सचं टेन्शन! जुलैपासून २५ टक्के वाढणार मोबाईल रिचार्ज; चेक करा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 8:55 AM

1 / 8
Reliance Jio Tariff Hike: रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. रिलायन्स जिओनं आपले सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन महाग केले आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान १५५ रुपयांचा होता, तो वाढवून १८९ रुपये करण्यात आलाय.
2 / 8
जुलै महिन्यापासून या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होणार आहे. जिओनं आपल्या सर्व मासिक, तीन महिन्यांच्या आणि वार्षिक प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय पोस्टपेड प्लॅनच्या दरातही वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आलीये.
3 / 8
रिलायन्स जिओने नुकतीच दरवाढ जाहीर केली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सर्व डेटा प्लॅन महाग करण्यात आले आहेत. हे नवे दर ३ जुलै २०२४ पासून महाग होणार आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्लान १५५ रुपयांऐवजी १८९ रुपयांना मिळणार आहे.
4 / 8
जिओने या प्लानमध्ये २२ टक्के वाढ केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारती एअरटेलच्या आधी जिओने या वाढीची घोषणा केली आहे. जिओनं आपल्या १९ प्लान्सचे टॅरिफ वाढवले आहेत. यामध्ये १७ प्रीपेड प्लॅन आणि २ पोस्टपेड प्लान्सचा समावेश आहे.
5 / 8
रिलायन्स जिओचा प्लान १५५ रुपयांपासून सुरू होतो. आता ३ जुलैपासून हा प्लॅन १८९ रुपयांपासून मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असेल. २०९ रुपयांच्या प्लानची किंमत आता २४९ रुपये असेल आणि त्याची वैधता २८ दिवसांची असेल.
6 / 8
ज्या २३९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा मिळायचा. आता या प्लानची किंमतीही वाढवण्यात आली आहे. २३९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता २९९ रुपये असेल आणि त्याची वैधता २८ दिवसांची असेल.
7 / 8
सर्वात कमी रिचार्जची किंमत १९ रुपये करण्यात येत आहे. हा १ जीबी डेटा 'अॅड-ऑन-पॅक' पॅक आहे, ज्याची किंमत १५ रुपये होती. हे प्रमाण सुमारे २५ टक्के अधिक आहे. रिलायन्स जिओनं आपले पोस्टपेड प्लानही महाग केले आहेत. ३० जीबी डेटा देणाऱ्या २९९ रुपयांच्या प्लानची किंमत आता बिलिंग सायकलसाठी ३४९ रुपये असेल. तर ७५ जीबी डेटा असलेल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता ४४९ रुपये असेल.
8 / 8
दरवाढीबरोबरच जिओ सेफ आणि जिओ ट्रान्सलेटचीही घोषणा जिओनं केली आहे. जिओ सेफ कॉलिंग, मेसेजिंग, फाइल ट्रान्सफरसाठी क्वांटम-सेफ अॅप असून महिन्याला १९९ रुपयांत उपलब्ध असेल. जिओ ट्रान्सलेट हे व्हॉईस कॉल, व्हॉईस मेसेज, टेक्स्ट आणि इमेजेसचे भाषांतर करण्यासाठी तयार करण्यात आलं असून त्याची किंमत ९९ रुपये आहे. सध्या एका वर्षासाठी याचं सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येणार आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ