Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ३ रूपये जास्त देऊन मिळवा अधिक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 8:36 PM
1 / 10 सध्या Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन्स किंवा ऑफर्स सातत्यानं लाँच करत असतात. 2 / 10 देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स बाजारात लाँच करत असते. कंपनीने अलीकडेच ५ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. 3 / 10 रिलायन्स जिओचे हे प्लॅन कोणत्याही डेटा मर्यादेशिवाय येतात. यापैकी एक प्लॅन ४४७ रुपयांचा आहे, जो दोन महिन्यांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, कंपनी यापूर्वीपासून ४४४ रुपयांचा दुसरा प्लॅन ऑफर करत आहे. 4 / 10 या प्लॅन्सच्या किमतीत फारसा फरक नाही. दोन्ही प्लॅन्समध्ये केवळ ३ रुपयांचा फरक आहे. दोन्ही प्लॅन्सच्या किंमती जवळपास सारख्याच असल्यानं कोणता प्लॅन घ्यावा याबाबत ग्राहकांना प्रश्न असतो. पाहूया दोन्ही प्लॅनमध्ये काय आहे फरक. 5 / 10 रिलायन्स जिओच्या ४४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा देण्यात येतो. 6 / 10 या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळते. 7 / 10 ४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता मिळते. तसंच एकूण ५० जीबी डेटा देण्यात येतो. हा डेटा कोणत्याही मर्यादेसह ग्राहकांना वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. 8 / 10 या प्लॅनसोबत ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. तसंच याशिवाय ग्राहकांना JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 9 / 10 पाहिलं तर दोन्ही प्लॅन्सची किंमत जवळपास सारखीच आहे आणि वैधतादेखील सारखीच आहे. परंतु ४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये ३ रुपये अतिरिक्त देऊन तुम्हाला ४ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. 10 / 10 ४४७ रूपयांच्या प्लॅनमध्ये जरी डेटा कमी मिळत असला तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तो वापरू शकता. तुम्हाला हवा असल्यास एका दिवसातही तो डेटा संपवण्याची तुम्हाला मुभा देण्यात आली आहे. आणखी वाचा