reliance mukesh ambani added 4 companies in 3 days in green energy business
Reliance: देशावर कोळसा संकट! मुकेश अंबानींचा धडाका, ३ दिवसांत ४ बड्या कंपन्यांवर ताबा; मोठी गुंतवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 3:32 PM1 / 10गेल्या काही दिवसांपासून देशात कोळसा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. वीज संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. भारतासह जागतिक पातळीवर हे संकट आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारने अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे.2 / 10अदानी समूह, रिलायन्स आणि टाटा समूहातील कंपन्यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. या क्षेत्रात विस्तार करण्याची योजना कंपन्यांनी आखली आहे. विशेषत: अदानी आणि रिलायन्स समूहाने अतिशय आक्रमकपणे काम सुरू केले आहे. 3 / 10पुढील दशकभर या दोन कंपन्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळू शकतो. या दोन्ही कंपन्यांमधील संघर्षामुळे सौर ऊर्जेच्या किमती बऱ्याच खाली येऊ शकतात. अंबानी आणि अदानी यांनी पारंपारिक ऊर्जा क्षेत्रात चांगले पाय रोवले आहेत. रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठे रिफायनिंग संकुल आहे. 4 / 10यातच आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हरित ऊर्जा क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी करार केला आहे. 5 / 10रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ (NexWafe GmbH) मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच डेन्मार्कची कंपनी स्टिस्डल (Stiesdal) सोबत करार केला आहे. त्यांनी सीरिज सी फायनान्सिंगद्वारे नेक्सवेफमध्ये २५ दशलक्ष युरोची गुंतवणूक केली आहे. 6 / 10या गुंतवणुकीमुळे रिलायन्स नेक्सवेफ कंपनीमध्ये एक धोरणात्मक आघाडी गुंतवणूकदार बनली आहे. ही जर्मन कंपनी मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स विकसित आणि निर्मिती करते. त्याला ग्रीन सोलर वेफर्स असेही म्हणतात, जे किफायतशीर आहे. या कराराची प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे रिलायन्सने म्हटले आहे. 7 / 10तसेच त्यांची उपकंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) ने डॅनिश कंपनी स्टिस्डल (Stiesdal A/S) सोबत करार केला आहे. त्यांचा उद्देश भारतात हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार करणे हा आहे. स्टिस्डल सध्या ते विकसित करत आहे.8 / 10स्टिस्डल हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्सशी संबंधित तंत्रज्ञानाला रिलायन्स (RNESL) ला परवाना देईल. अंबानींनी पुढील तीन वर्षांत नवीन स्वच्छ ऊर्जा (New Clean Energy) व्यवसायात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिलायन्सने २०३५ पर्यंत निव्वळ कार्बन न्यूट्रल बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.9 / 10रिलायन्सने क्लिन एनर्जी क्षेत्रातील दोन कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. सौर पॅनेल निर्माता REC Solar Holdings AS (REC Group) मधील १०० टक्के हिस्सेदारी चीन नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनीकडून खरेदी केली आहे, अशी माहिती देण्यात आली होती. हा करार ५ हजार ७९२ कोटी रुपयांचा आहे. 10 / 10तसेच कंपनीने स्टर्लिंग अँड विल्सन पॉवरमधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधी कार्य करते. एका दशकात १०० गीगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे लक्ष्य रिलायन्सने ठेवले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications