Reliance Mukesh Ambani Asias Richest Man Did Not Take Any Salary in FY21 Amid COVID
Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 8:01 PM1 / 12सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या देशातील परिस्थितीथी सुधारताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी यावर्षी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.2 / 12३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मुकेश अंबानी यांनी कोणत्याही प्रकारचं वेतन घेतलं नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छेनं वेतन न घेण्याचा निर्णय घेतला.3 / 12कंपनीनं सादर केलेल्या अहवालानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अंबानी यांनी कोणतंही वेतन घेतलं नाही. यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात त्यांना कंपनीकडून १५ कोटी रूपयांचं वेतन मिळालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन १५ कोटी रूपयेच होतं.4 / 12तर मुकेश अंबानी यांचे बंधू निखिल आणि हिताल मेसवानी यांचं वेतन २४ कोटी रूपये कायम राहिलं आहे. परंतु यामध्ये यावेळी १७.२८ कोटी रूपयांचं कमिशन सामील आहे.5 / 12मुकेश अंबानी यांच्या कंपनीत कार्यकारी संचालक पदी कार्यरत असलेल्या पीएनएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या वेतनात वाढ झाली आहे. प्रसाद यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात ११.९९ कोटी रूपयांचं वेतन मिळालं. गेल्या वर्षी त्यांना ११.१५ कोटी रूपये वेतन मिळालं होतं. 6 / 12मुकेश अंबनी यांच्या पत्नी नीता अंबानी या कंपनीत नॉन एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रूपये आणि १.६५ कोटी रुपयांचं कमिशन मिळालं. 7 / 12याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.8 / 12रिलायन्स कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पुढील ५ वर्ष पूर्ण पगार देणार असून १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतही देणार आहेत. तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे.9 / 12कोरोना महामारीचं संकट पाहता मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी ५ वर्षापर्यंत पगार आणि मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च आणि पुस्तकांचा खर्च उचलणार आहे.10 / 12त्याशिवाय पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत पती किंवा पत्नी, आईवडील आणि मुलांच्या हॉस्पिटालायजेशन कवरेज १०० टक्के प्रिमियम कंपनीकडून भरला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एकरकमी १० लाख रुपये दिले जातील.11 / 12ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला संक्रमण झालं असेल तर शारिरीक, मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोविड १९ सुट्टी दिली जाऊ शकते. 12 / 12ही सुट्टी पॉलिसीत वाढवण्यात आली असून रिलायन्सच्या सर्व कर्मचारी पूर्णपणे बरे होण्यासाठी किंवा कुटुंबातील कोविड १९ पॉझिटिव्ह सदस्यांची देखभाल करण्यावर फोकस करू शकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications