शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानींची दूरदृष्टी! इंग्लंडमध्ये ‘या’ उद्योगासाठी केली १०० कोटी पौंडची गुंतवणूक; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:03 PM

1 / 12
जगाचे भविष्य हे इलेक्ट्रिक वाहनांचे असणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदुषण, इंधनाचे वाढते दर आणि भविष्यातील घटनांचा मागोवा घेत जगभरातील बहुतांश कंपन्यांनी ईव्ही सेक्टरकडे आपला मोर्चा वळवला आहे.
2 / 12
भारतातही इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. भारतीय ग्राहकांचा कलही हळूहळू ईव्ही वाहनांकडे जात असल्याचे कंपन्यांच्या वाहन विक्रीच्या आकड्यांवरून मानले जात आहे. यातच मुकेश अंबानी यांनी याचाच एक भाग असलेल्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत सगळीकडे लिथियम-आयन बॅटरी वापरली जात आहे. अशा परिस्थितीत आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी इंग्लंडमध्ये मोठी खरेदी केली आहे. अंबानींनी सोडियम बॅटरी तयार करणारी कंपनीत १० कोटी पौंडची गुंतवणूक केली आहे.
4 / 12
मुकेश अंबानी त्यांच्या पॉवर स्टोरेज गिगाफॅक्टरीसाठी लिथियमपेक्षा सोडियमचा एक चांगला पर्याय म्हणून विचार करत आहेत. कारण पृथ्वीवर सोडियमचे प्रमाण लिथियमच्या ३०० पट जास्त आहे.
5 / 12
आताच्या घडीला जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे लिथियमच नाही, तर उच्च दर्जाचे निकेल, कोबाल्ट आणि ऊर्जा साठवू शकणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरल्या जात आहेत, पण हळूहळू या गोष्टींची उपलब्धता कमी होत जाणार आहे.
6 / 12
ताज्या अहवालांनुसार, २०३० पर्यंत लिथियम-आयन बॅटरी बनवण्यासाठी धातूची मागणी ५ पटीने वाढू शकते. त्यामुळे २०२२ मध्ये बॅटरीच्या किमतीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. अंबानींची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड ७६ अब्ज डॉलरच्या स्वच्छ ऊर्जा व्यवसायावर मोठा डाव खेळला आहे.
7 / 12
मुकेश अंबानींची इच्छा आहे की, शास्त्रज्ञांनी अशा तंत्रज्ञानावर काम करावे, जे पारंपरिक लीड-अ‍ॅसिड बॅटरींइतके स्वस्त आहे आणि ते तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य सहज सापडेल.
8 / 12
भारतातील किंवा जगभरातील ग्राहकांसाठी बॅटरीची कार्यक्षमता सर्वात महत्त्वाची आहे, असे अंबानींना वाटते. जर सर्व बॅटरी निर्मात्यांनी लिथियमवर सट्टा लावला, तर ते फार काळ चालणार नाही. तसेच कोबाल्टचा साठाही फार मोठा नाही.
9 / 12
सध्या उद्योगात सोडियमचा वापर खूप कमी केला जात आहे आणि सोडियम आयन बॅटरीबद्दल बोलायचे झाले, तर त्यातून प्रति तास १६०-१७० वॅट ऊर्जा मिळू शकते. नवीन तंत्रज्ञान आल्याने सोडियमची क्षमता २०० वॅट प्रति तासपर्यंत पोहोचू शकते. हे टेस्लाच्या मॉडेल 3 च्या मानक श्रेणीच्या बरोबरीत किंवा चांगले कार्य करते आहे, असे यूके स्थित व्हेंचर कॅपिटल लिस्ट अश्विन कुमार स्वामी यांनी सांगितले.
10 / 12
दरम्यान, अदानी समूहाचे गौतम अदानी आता ऑटो क्षेत्रातही जबरदस्त एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. गौतम अदानी लवकरच इलेक्ट्रीक व्हेइकल सेगमेंटमध्ये प्रवेश करू शकतात. जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या वाहनांसाठी एसबी अदानी ट्रस्टला ट्रेडमार्क मिळाला आहे.
11 / 12
गौतम अदानी यांचा हा उपक्रम व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांच्या सेमगेंटमध्ये एन्ट्री घेण्याच्या विचारात आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यामध्ये बस आणि ट्रक या दोन्हींचा समावेश असेल.
12 / 12
सुरुवातीला, कंपनीचे इलेक्ट्रीक वाहन समूहाच्या स्वतःच्या वाहतुकीशी संबंधित कामासाठी वापरले जाईल. याशिवाय, ही कंपनी इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरीचं उत्पादन करेल आणि देशभरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचीही पायाभूत सुविधा तयार करेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर