शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance: मुकेश अंबानी ‘ही’ कंपनी खरेदी करणार; ३ कोटी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेगा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 2:21 PM

1 / 12
Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता रिटेल क्षेत्रात मोठी आघाडी घेण्यासाठी एक मोठी योजना आखल्याचे सांगितले जात आहे.
2 / 12
रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असताना कोट्यवधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी थेट एका कंपनीला मोठी ऑफर दिली आहे.
3 / 12
या कंपनीच्या माध्यमातून छोटे आणि मोठे व्यवसायिक, उद्योजक थेट रिलायन्सच्या संपर्कात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे रिलायन्सकडून कंपनी खरेदीच्या हालचाली सुरू झाल्याची कुणकुण लागताच संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
4 / 12
देशभरातील व्यवसायिकांची माहिती एकाच मंचावर संकलित करणारी 'जस्ट डायल' ही सर्च आणि लिस्टिंग कंपनी आहे. छोट्या मोठ्या व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या क्षेत्रातील कंपनी जस्ट डायल ला थेट खरेदी करण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. (just dial)
5 / 12
गेल्या २५ वर्षांपासून 'जस्ट डायल' या क्षेत्रात काम करत आहे. या कंपनीसाठी रिलायन्स समूहाकडून प्रयत्न केले जात आहे. 'जस्ट डायल'साठी रिलायन्सने ८० ते ९० कोटींचा खरेदीचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे.
6 / 12
रिलायन्सच्या ऑफरचा परिणाम भांडवली बाजारात दिसून आला आहे. 'जस्ट डायल लिमिटेड'चा शेअर मागील सहा महिन्यात जवळपास ५२ टक्क्यांनी वधारला आहे. हा करार अंतिम झाल्यास रिलायन्स जस्ट डायलवर ताबा मिळवेल.
7 / 12
रिटेल व्यवसायात जस्ट डायल रिलायन्सची ज्युनियर पार्टनर म्हणून काम करेल, असे म्हटले जात आहे. मात्र, या या चर्चेबाबत रिलायन्स आणि जस्ट डायलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
8 / 12
जस्ट डायलसाठी टाटा समूहाकडून देखील एप्रिल महिन्यात प्रयत्न करण्यात आले होते, मात्र बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर रिलायन्स समूहाने यात एंट्री घेतली आहे. रिलायन्सच्या ऑफरवर चर्चा करण्यासाठी जस्ट डायलने संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे.
9 / 12
तंत्रज्ञान विकासाने ई-कॉमर्स कंपन्या, बी टू बी मंच नावारूपाला आले असले तरी त्यांची पोहोच मर्यादित आहे. 'जस्ट डायल'कडे देशभरातील तब्बल ३ कोटी व्यावसायिकांचा डेटाबेस आहे.
10 / 12
आर्थिक वर्ष २०२० मध्ये जस्ट डायल वर सरासरी १५ कोटी ३३ लाख युनिक युजर्सने भेट दिली. सुमारे ८२ टक्के युजर जस्ट डायल मोबाईल आणि ऍपमधून सर्च करतो.
11 / 12
२५० हून अधिक शहरे आणि ११ हजार पिनकोड्समधील व्यावसायिकांची जस्ट डायलकडे आहे माहिती आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीला ९५० कोटींचा महसूल मिळाला.
12 / 12
३१ मार्च २०२० अखेर २७२.९ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीमध्ये ३५.३२ टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे तर २८.६८ टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसाय