8000 एकर परिसर, वर्ल्ड क्लास सुविधा; मुकेश अंबानी 'या' ठिकाणी उभारताहेत त्यांची ड्रीम सिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:31 IST
1 / 8 Reliance Smart City : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी (Reliance Smart City) उभारणार आहेत. 2 / 8 मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सद्वारे ही स्मार्ट सिटी उभारली जात आहे. या शहराला मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप लिमिटेड किंवा मेट सिटी, असे नाव देण्यात आले आहे. 3 / 8 या प्रोजेक्टमध्ये जपानच्या 4 कंपन्या सहभागी होणार आहेत. रिलायन्सची मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप (MET) ही उत्तर भारतातील सर्वात वेगाने वाढणारी टाउनशिप आहे. 4 / 8 हे सर्वात वेगाने वाढणारे शहर देखील बनले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात अनेक ब्रँडच्या 450 हून अधिक कंपन्या येथे आल्या आहेत. रिलायन्सच्या एमईटी सिटीला एका वर्षात दोन पुरस्कारही मिळाले आहेत.5 / 8 रिलायन्सने हरियाणातील झज्जर जिल्ह्यात 8,000 एकर जागेवर जागतिक दर्जाची ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 900 एकर जागेवर शहर वसविण्याचा परवाना मिळाला आहे. 6 / 8 कंपनीने आतापर्यंत येथील जमिनीच्या पायाभूत सुविधांवर 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात 5 औद्योगिक क्षेत्रे आहेत, तर 2 प्रकल्प SCO चे आहेत. आतापर्यंत येथे 25 हजार रोजगार निर्माण झाले आहेत.7 / 8 रिलायन्सच्या या नव्या शहराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी. याची दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि प्रदेशातील इतर शहरांशी मजबूत कनेक्टिव्हिटी आहे. 8 / 8 हे शहर रणनीतिकदृष्ट्या कुंडली मानेसर पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) शी रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल.