शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance: नववर्षात रिलायन्सची पहिलीच खरेदी, गुजरातमधील कंपनीसोबत डील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 12:48 PM

1 / 10
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे गेल्या काही वर्षांपासून रिटेल क्षेत्रात मोठा विस्तार करण्यात गुंतले आहेत. अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते, असे म्हणतात.
2 / 10
तसाच काहीसा प्रकार एक चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीसोबत घडला आहे. रिलायन्स रिटेल (Reliance Retail) या चॉकलेट कंपनीमध्ये ५१ टक्क्यांची मालकी खरेदी करणार असल्याचे वृत्त आले आणि कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.
3 / 10
आता मुकेश अंबानींनी नवीन वर्षाची पहिली मोठी खरेदी केल्याचे वृत्त आहे. रिलायन्स रिटेलने याबाबतची घोषणा केली आहे, गुजरातची १०० वर्षे जुनी बेवरेज कंपनी (Sosyo) मध्ये रिलायन्स रिटेल ५० टक्के भागिदारी घेणार आहे.
4 / 10
मुकेश अंबानी हेच रिलायन्सचे सर्वेसर्वा असले तरी रिलायन्स रिटेल व्हेंचरची जबाबदारी मुलगी ईशा अंबानीकडे आहे. तिच्या साथीने अंबानी सातत्याने व्यवसाय वाढवत निघाले आहेत.
5 / 10
रिलायन्स कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) गुजरातच्या कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (CSD) आणि ज्युस बनवणारी कंपनी सोस्यो हजूरी बेवरेजेज प्राइवेट लिमिटेड मध्ये ५० टक्के भागिदारी करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीकडून होत असलेली ही पहिलीच मोठी डील आहे.
6 / 10
आपल्या बेवरेजेस पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासाठी कंपनी RCPL ला सक्षम बनवणार आहे. कंपनीत ५० टक्के भागिदारी रिलायंस आपल्या नावे करणार आणि उर्वरीत भागिदीरी ही सध्याचे कंपनीचे मालक हजूरी फॅमिलीकडे राहणार आहे.
7 / 10
Sosyo हा कार्बोनेट शीतल पेय (सीडीएस) आणि ज्यूस बनवणारी १०० वर्षे जुनी प्रतिष्ठीत भारतीय कंपनी आहे. १९२३ मध्ये अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी कंपनीची स्थापनला केली.
8 / 10
गुजरातमध्ये ही कंपनी Sosyo, Kashmira, Lemee, Ginlim, Runner, Opener, Hajoori Soda आणि S'eau यांसारख्या ब्रँडसह मार्केटमध्ये मोठा उद्योग टिकवून आहे. आता, कंपनीत रिलायन्सची ५० टक्के भागिदारी असणार आहे.
9 / 10
देशातील ब्रँड आणि स्थानिक उद्योगांना गती देण्याचं काम आम्ही करत आहोत. रिलायन्स जाईंट वेंचरमध्ये आम्ही सोस्योसोबत भागिदरी करत असल्याचं ईशा अंबानी यांनीही सांगितलं.
10 / 10
दरम्यान, रॉयटर्सच्या मते, रिलायन्स रिटेलने लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमधील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे. यासाठी 113 रुपये प्रति शेअरची किंमतही निश्चित करण्यात आल्याचेही काही दिवसांपूर्वी वृत्त होते.
टॅग्स :Relianceरिलायन्सbusinessव्यवसाय