Jio Celebration Plan : दररोज 2.5GB डेटा, वर्षभर रिचार्चचं टेन्शन नाही; मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, जिओचा जबरदस्त प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 4:28 PM
1 / 9 सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तर आपल्याकडे असलेले ग्राहक टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं काही नवनवे प्लॅन्स लाँच करत असतात. 2 / 9 रिलायन्स जिओच्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आहे. कंपनीने सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत 2999 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये दररोज 2.5GB डेटा देण्यात येतो. 3 / 9 या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच एका रिचार्जवर वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याचं टेन्शनही राहणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया या प्लॅनबद्दल अधिक माहिती. 4 / 9 हा एका वर्षांच्या वैधतेसह मिळणारा प्लॅन आहे. म्हणजेच 2999 रुपयांच्या एका रिचार्जवर तुम्हाला 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळेल. याचाच अर्थ वर्षाला एकूण 912.5 GB डेटा देण्यात येणार आहे. 5 / 9 दैनंदिन मर्यादा संपल्यावर इंटरनेट 64Kbps च्या वेगाने चालेल. प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग देखील उपलब्ध असेल. दररोज 100 एसएमएसदेखील दिले जातील. याशिवाय रिलायन्स जिओच्या Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio Cloud आणि अन्य अॅप्सचंही मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येईल. 6 / 9 जिओच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसांमध्ये दररोज 8.22 रुपये खर्च करून 2.5 GB डेटा मिळेल. तर 365 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटासह कंपनीच्या प्लॅनची किंमत 2879 रुपये आहे. 7 / 9 म्हणजेच, 120 रुपये अधिक भरल्यास, तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 500 MB अधिक डेटा मिळेल. एकूण, एका वर्षात 182.5 GB डेटा अधिक मिळणार आहे. 8 / 9 जिओने 499 रुपयांचा प्लान पुन्हा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney + Hotstar चे अॅन्युअल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 केबीपीएस होईल. 9 / 9 तसंच या प्लॅनसोबत 28 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध असतील. Jio Cinema, Jio TV सारख्या सर्व Jio अॅप्सचं सबस्क्रिपशनही या प्लॅनसोबत मिळणार आहे. आणखी वाचा