शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! Paytm Payments Bank ने मार्चमध्ये केले तब्बल ९७ कोटींचे डिजिटल व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 6:00 PM

1 / 10
कोरोना संकटामुळे कोट्यवधी ग्राहक डिजिटल व्यवहारांकडे वळले आहेत. भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये अनेक पटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये Paytm आघाडीवर आहे.
2 / 10
Paytm Payments Bank ला मान्यता मिळाल्यानंतर अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच पेटीएम हा देशातील एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
3 / 10
Paytm Payments Bank ने मार्च महिन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मंगळवारी पीपीबीएलनेच ही माहिती दिली.
4 / 10
मार्च महिन्यात ९७ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले आहेत. पेटीएम वॉलेट, पेटीएम फास्टॅग, पेटीएम यूपीआय आणि नेट बँकिंगद्वारे हे सर्व व्यवहार झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.
5 / 10
यूपीआय व्यवहारांसाठी कंपनी सर्वात मोठे माध्यम आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. पेटीएम बँक दरमहा सुमारे १० लाख बचत आणि चालू खाती उघण्यात आली आहेत.
6 / 10
तसेच ६.४ कोटींहून जास्त खात्यांसह बँकेकडील एकूण ठेवी ३२०० कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. यूपीआय व्यवहारांसाठी पीपीबीएल अजूनही सर्वात मोठी बँक असल्याचे सांगितले जात आहे.
7 / 10
Paytm Payments Bank चा लाखो लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून, पेटीएम व्यवहाराची सुलभता आणि एकत्रीकरण प्रक्रिया यामुळे फास्टॅगमध्येही पेटीएम लोकप्रिय असल्याचे म्हटले जात आहे.
8 / 10
पीपीबीएलने आतापर्यंत सुमारे २७० टोल प्लाझामध्ये कॅशलेस टोल पेमेंट्स आणि ५.७ कोटींहून अधिक मासिक व्यवहारांची नोंद केली आहे.
9 / 10
तसेच पेटीएम पेमेंट बँकेमार्फत ९० लाखांहून अधिक एफएएसटी टॅग आणि ४.२ लाख व्यवहार एका महिन्यात झाल्याचे सांगितले जात आहे. Paytm Payments Bank चे व्यवस्थापक सतीश कुमार गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली.
10 / 10
डिजिटल बँकिंग आणि पेमेंट्स मधील आमचे नेतृत्व संपूर्ण देशाने आमच्या सेवांमध्ये दाखविलेल्या विश्वासाची साक्ष आहे. आत्मानिरभार भारत उभारण्यात आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास वचनबद्ध आहोत, असे कुमार यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएम