शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या छोट्या कंपनीला अयोध्येतून मिळाली ऑर्डर; 10 पैशांचा शेअर ₹300 वर पोहोचलाय, दिला 3100000% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 5:13 PM

1 / 7
शेअर बाजारातील एक छोटी कंपनी रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या कंपनीचा शेअर बुधवारी 7 टक्क्यांच्या उसळीसह 324.30 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर कधी काळी 10 पैशांवर होता.
2 / 7
रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ही तेजी नुकत्याच मिळालेल्या एका ऑर्डरमुळे आली आहे. कंपनीने एक्सचेन्ज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला अयोध्येतील अनेक हॉस्पिटॅलिटी तसेच इतरही काही प्रोजेक्टसाठी मुख्य पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्टनरशिप्समुळे कंपनीच्या रेव्हेन्यूवर चांगला परिणाम होईल, असे कंपनीला वाटते.
3 / 7
10 पैशांवरून 300 रुपयांवर पोहोचला शेअर - रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांन मालामाल केले आहे. कंपनीचा शेअर 20 ऑगस्ट 2004 रोजी 10 पैशांवर होता. तो 24 जानेवारी 2024 ला 324.30 रुपयांवर पोहोचला आहे.
4 / 7
या कालावधीत रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 364.80 रुपये, तर नीचांक 104.95 रुपये आहे.
5 / 7
10 महिन्यांत शेअरमध्ये 200% ची वाढ - रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 10 महिन्यांतही तुफान तेजी दिसून आली आहे. या शोट्या कंपनीच्या शेअरने 10 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 27 मार्च 2023 रोजी 108.45 रुपयांवर होता. तो 24 जानेवारी 2024 रोजी 364.80 रुपयांवर पोहोचला आहे.
6 / 7
गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, कंपनीचा शेअर 70 टक्क्यांनी वधारला आहे. ही कंपनी व्हिनाइल फ्लोअरिंग, सिंथेटिक लेदर आणि लक्झरी व्हिनाइल फ्लोरिंग, जसे पीव्हीसी प्रोडक्ट्स तयार करते. ही फ्लोरिंग आणि वॉल कव्हरिंगसाठी इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स उपलब्ध करवणारी मुख्य कंपन्यांपैकी एक आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा