शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Online Food : रेस्तराँमधून ऑनलाइन जेवण मागवणं पडतं ६० टक्क्यांपर्यंत महाग, सर्वेक्षणातून बाब आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 2:16 PM

1 / 8
जर तुम्ही कोणत्याही ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणाऱ्या अॅप्सवरून जेवण मागवत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला 10 ते 60 टक्क्यांपर्यंत अधिक पैसे द्यावे लागतात. आंतरराष्ट्रीय संस्था जेफरीजनं दिल्लीसह देशभरातील आठ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. 80 रेस्तराँच्या सर्वेक्षणातून आता ही बाब समोर आली आहे.
2 / 8
जेफरीजच्या अहवालानुसार, कमिशन आणि प्रमोशनच्या उच्च किंमतीमुळे, बहुतेक रेस्टॉरंट्सचे फूड डिलिव्हरी अॅप्स आणि रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या मेनूमध्ये खूप फरक आहे. जी डिश तुम्ही रेस्टॉरंटमध्ये 100 रुपयांमध्ये खाता, तीच डिश तुम्हाला 110 ते 160 रुपयांमध्ये फूड डिलिव्हरी अॅपवर मिळत आहे.
3 / 8
किमतीतील तफावतीची तीन मुख्य कारणे आहेत. हे पॅकिंग, प्रमोशन आणि कमिशन आहेत. जवळपास निम्मी रेस्टॉरंट्स पॅकिंग शुल्क आकारतात, जे बिलाच्या 4-5 टक्के आहे. डिलिव्हरी शुल्क हे ग्राहकांना आकारल्या जाणार्‍या किमतीच्या सुमारे 13 टक्के असते. त्याचप्रमाणे, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये ऑनलाइन फुड डिलिव्हरी अॅपसह वेगळे कमिशन निश्चित केले जाते. या तीन कारणांमुळे दरातील तफावत दिसून आली आहे.
4 / 8
जेफरीजने देशभरातील आठ प्रमुख शहरांमधील 80 रेस्टॉरंटचे सर्वेक्षण केले आणि खाद्यपदार्थांच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतींची तुलना केली. यामध्ये संस्थेने वेगवेगळ्या ठिकाणांहून मागवण्यात आलेल्या 120 ते 2800 रुपयांपर्यंतच्या 240 ऑर्डर्सची माहिती गोळा केली. दरम्यान, सर्वेक्षणात 80 टक्के रेस्टॉरंटमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन डिशच्या किमतीत मोठी तफावत दिसून आली.
5 / 8
डिलिव्हरी अॅपवर विविध ऑफर असूनही, रेस्टॉरंटमध्ये जाणे किंवा ते स्वतः आणणे स्वस्त तुलनेने आहे. जेफरीजच्या अहवालानुसार, ऑनलाइन किमतींमध्ये साधारणपणे 10 टक्के सूट मिळते. असे असूनही, सरासरी किंमत ऑफलाइनपेक्षा 17-18 टक्के जास्त आहे.
6 / 8
“आपण स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून ऑनलाइन स्नॅक्सची सुविधा देतो. ऑनलाइन वस्तू 30 ते 40 टक्के महाग विकल्या जातात. याचे कारण ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीला दिले जाणारे शुल्क आहे. या कंपन्या बिलावर 28 टक्क्यांपर्यंत कमिशन आकारतात. यामुळे त्यांना हे शुल्कही ग्राहकांकडूनच घ्यावे लागत आहे,” असे साऊथ कॅम्पसमध्ये रेस्टॉरंट चालवणारे राजेश चौरंगी म्हणाले.
7 / 8
दिलशाद गार्डनमधील चॅपच्या प्रसिद्ध दुकानाचे मालक दविंदर सिंग सांगतात की, जेव्हा अॅपद्वारे बुकिंग आमच्याकडे येते तेव्हा आम्हाला दुकानाच्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करावी लागते, कारण संबंधित अॅपलाही आम्हाला कमिशन द्यावे लागते. एका प्लेटची किंमत 200 रुपये असेल तर ती अॅपवर 240 किंवा 250 रुपयांना विकली जाईल.
8 / 8
ऑनलाइन जेवणं मागवणं आमचा नाईलाज होता. परंतु आता आपणच जाऊन जेवण घेऊन येतो, असं एका ग्राहकानं सांगितलं. तर जे मोठे रेस्तराँ आहेत ते अधिक पैसे घेत नाहीत, परंतु याच्या जागी डिलिव्हरीच्या रुपात 50 ते 80 रूपये घेतात. तर छोट्या रेस्तराँमधून जेवण मागवणं 30 ते 40 टक्के महाग पडत असल्याची प्रतिक्रिया आणखी एका ग्राहकाने दिली.
टॅग्स :Swiggyस्विगीZomatoझोमॅटोfoodअन्न