शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभिमानास्पद! मराठी उद्योजक, मसाला किंग धनंजय दातार यांचा दुबईत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 5:27 PM

1 / 10
जागतिक स्तरावर असे अनेक भारतीय आहेत, जे आपली मेहनत, जिद्द, सचोटी, चिकाटी, अथक परिश्रम यांच्या आधारे जगभरात आपल्यासह भारताचाही डंका नावलौकिक वाढवत असतात. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मसाला किंग म्हणून ख्याती असलेले डॉ. धनंजय दातार.
2 / 10
दुबईस्थित अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘रीटेल एमई’ माध्यमगृहातर्फे नुकतेच ‘रीटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
3 / 10
डॉ. दातार यांनी मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका (मिडल इस्ट अँड नॉर्थ आफ्रिका - मीना) विभागात रीटेल उद्योगाच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद अल–तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहम्मद सुहैल यांच्या उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार देण्यात आला.
4 / 10
दुबईच्या बिझनेस बे भागातील जेडब्ल्यू मार्क्विस येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात ‘रीटेल एमई’तर्फे मीना विभागातील आघाडीच्या रीटेल लीडर्सची यादी जाहीर करण्यात आली. या पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्या रीटेलर्सनी नेतृत्वाबरोबरच अभिनवतेचेही सुस्पष्ट उदाहरण दाखवून दिले आहे.
5 / 10
विभागातील आघाडीच्या रीटेलर्सची ओळख जगाला पटवून देणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे, असे सांगितले जाते. जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहांपैकी असणाऱ्या ‘रीटेल एमई’तर्फे आमच्या कामाची दखल घेतली जाणे हा मोठा सन्मान आहे.
6 / 10
संयुक्त अरब अमिरातीत भारतीय मसाल्यांबाबत आघाडीचे नाव असलेल्या आमच्या अल अदील समूहासाठीही ही अभिमानास्पद कामगिरी आहे. या पुरस्काराच्या निवडीत अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आचरली जात असल्याने आमच्यावर अधिक उत्तम कामगिरी करुन दाखवण्याची जबाबदारी आली आहे.
7 / 10
‘रीटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल डॉ. धनंजय दातार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (masala king dr dhananjay datar)
8 / 10
डॉ. धनंजय दातार यांच्या ‘अल अदील ट्रेडिंग’ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
9 / 10
तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. अल अदील समूहाचे सध्या ४९ आऊटलेट्स असून लवकरच ५० वे आऊटलेटही सुरू होत आहे.
10 / 10
त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे.
टॅग्स :DubaiदुबईUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIndiaभारत