शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चाळीशीत रिटायर्मेंट? ‘फायर’ फॉर्म्युला वापरा; पैसा कमावण्याची कटकट दूर होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 7:42 AM

1 / 10
सरकारी किंवा खासगी नोकरीतून वयाची ५८ किंवा ६० वर्षे पार केल्यानंतर निवृत्त व्हावे लागते. काही ठिकाणी ६५ वर्षांपर्यंत लोक नोकरी करताना दिसतात. परंतु हल्लीची स्मार्ट तरुणपिढी इतका दीर्घकाळ वाट पाहण्यास तयार नसते.
2 / 10
वयाच्या चाळीशीत त्यांना नोकरी किंवा पैसा कमावण्याच्या कटकटीपासून दूर जाऊन आपल्या मर्जीने आयुष्य जगायचे असते. हे साध्य करायचे असले तरी त्यासाठी त्यांना आधी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे लागते. रोजचे खर्च आणि अचानक येणारी संकटे यासाठी आर्थिक तजवीज करून ठेवावी लागते.
3 / 10
काय आहे ‘फायर’? - यासाठी ते ‘फायर’हा फॉर्म्युला वापरतात. म्हणजेच फायनान्शिअल इंडिपेंडेस, रिटायर अर्ली. हा फॉर्म्युला म्हणजे बचत आणि गुंतणुकीचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
4 / 10
निवृत्तीसाठी किती पैसे हवे ? - कार्यरत असतानाच्या कालखंडात वार्षिक कमाईतील ५० ते ७० टक्के रकमेची बचत करावी लागते. यासाठी त्या व्यक्तीला सध्याच्या एकूण खर्चाच्या ३० पट इतकी रक्कम जमवावी लागते.
5 / 10
तुमची मिळकत सातत्याने वाढवा - महिन्याच्या मिळकतीमधून ५० ते ७० टक्के रक्कम वाचविताना सध्याच्या महागाईला तोंड देणे भाग आहे.
6 / 10
निवृत्तीनंतरचे आर्थिक गणित साधायचे असेल तर एखादी पार्टटाइम नोकरी करा. बचतीचे गणित साधण्यासाठी आणखी मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी प्रयत्न करा.
7 / 10
खर्च कमी करा, ऑफर्सचा फायदा - बचतीचे उद्दिष्ट साधण्यासाठी स्मार्ट नियोजन करण्याची सवय लावून घ्या. नव्याऐवजी जुनी गाडी वापरा. कुठेही जायचे असल्यास शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा.
8 / 10
क्रेडिट कार्डाचा वापर करीत असाल तर त्यावर कर्ज काढणे टाळा. कार्डावरील रिवॉर्ड आणि कॅशबॅकचा वेळीच फायदा घ्या.
9 / 10
प्रभावी गुंतवणुकीकडे लक्ष द्या -जास्तीत जास्त परताव्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. नेमकी योजना निवडण्यासाठी आर्थिक गुंतवणूकदारांचा सल्ला घ्या.
10 / 10
चांगली पॉलिसी, म्युच्युअल फंड, पीपीएफ, बँक एफडी आदी सर्व पर्यायांचा स्मार्टपणे उपयोग करून घ्या.
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूक