शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाकाळात घेतली रिस्क, लाखोंची नोकरी सोडली; ६ महिन्यात उभा केला ७००० कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 9:45 AM

1 / 6
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक तरुण-तरुणी लाखोंची नोकरी सोडून स्टार्टअपमध्ये आल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आज आपण पाहणार आहोत अशा तरुणाची कहाणी ज्यानं सहा महिन्यांमध्ये तब्बल साडेसात हजार कोटींची कंपनी उभी केली.
2 / 6
2019 मध्ये, अनंत नारायण यांनी प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट Myntra मधली टॉप मॅनेजमेंटची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांची फर्म मेन्सा ब्रँड अवघ्या 6 महिन्यांत 1 अब्ज डॉलर्सची कंपनी बनली. नारायणन त्यांच्या मेन्सा ब्रँड्सद्वारे सुमारे 30 ब्रँड्सना सेवा देतात. येत्या 10 वर्षांत ही संख्या 300 पर्यंत नेण्याची नारायणन यांची योजना आहे.
3 / 6
अनंत नारायणन हे ऑनलाइन फॅशन कंपनी Myntra चे सीईओ होते. त्यांनी मद्रास आणि मिशिगन विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केले. सीईओ म्हणून मिंत्रा-जबाँगचं नेतृत्व करण्यापूर्वी, नारायणन यांनी मॅकिन्से अँड कंपनी (McKinsey & Company) सारख्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम केलं. यानंतर ते मेडलाइफचे को-फाऊंडरदेखील होते.
4 / 6
त्यानंतर अनंत नारायणन यांनी मेन्सा ब्रँड्सची स्थापना केली, जी देशातील पहिली ई-कॉमर्स रोल-अप कंपनी बनली. ज्याचे मूल्य 1.2 अब्ज डॉलर्स आहे. ही कंपनी मे 2021 मध्ये कोविड महासाथीच्या काळात सुरू झाली. बीक्यू प्राइमच्या अहवालानुसार, त्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे 1,005 कोटी रुपये उभारल्यानंतर 7,447 कोटी रुपयांच्या मूल्यावर पोहोचून युनिकॉर्नचा दर्जाही मिळवला.
5 / 6
मेन्सा ही कंपनी अमेरिकेतील Thras.io च्या व्यवसायाच्या कल्पनेवर आधारित आहे. विविध ब्रँड्सना तांत्रिक सेवा देण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. देशातील छोटे ब्रँड अधिक चांगल्या प्रकारे उदयास यावे हा यामागील उद्देश आहे.
6 / 6
कंपनीचा वार्षिक ग्रोथ रेट 100 टक्के आहे. मेन्सा ब्रँड्सचं पुढील 10 वर्षांत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 300 ब्रँड तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं डिसेंबर 2022 मध्ये हैदराबाद समिटमध्ये नारायणन यांनी सांगितलं असल्याचं बिझनेस स्टॅडर्डच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी