Roshni Nadar Malhotra the hcl boss with rs 84330 crore networth
लेकीने सांभाळली वडिलांच्या व्यवसायाची धुरा; ठरली 'धनलक्ष्मी', आता कोट्यवधींची उलाढाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 5:39 PM1 / 8HCL च्या चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा HCL चे फाउंडर शिव नादर यांची एकुलती एक मुलगी आहे. वडील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. वडिलांकडून त्यांनी व्यवसायाविषयक अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत. 2 / 8दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. रोशनी यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यांना कम्युनिकेशन स्टडी, रेडिओ, चित्रपट, टीव्ही या विषयांमध्येही रस होता. त्यांनी आपला छंद पूर्ण केला. अमेरिकेतच एका टीव्ही शोमध्येही काम केलं. नंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची डिग्री घेतली.3 / 8शिव नादर यांनी 1976 मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. लहानपणापासूनच रोशनी य़ांना वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते. शिक्षण पूर्ण करून त्या वडिलांच्या कंपनीत रुजू झाल्या. वडिलांच्या देखरेखीखाली संपूर्ण काम शिकून घेतले. 4 / 82009 मध्ये, HCL कॉर्पोरेशनच्या एग्जीक्यूटिव डायरेक्टरआणि CEO म्हणून नियुक्ती झाली. 2019 मध्ये, रोशनी एचसीएल टेक्नॉलॉजीजची चेअरपर्सन झाल्या. वडिलांच्या कंपनीची धुरा रोशनी यांच्या हातात आली. ती वाढवणे आणि पुढे नेणे ही पहिली जबाबदारी होती.5 / 8रोशनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी एचसीएल कॉर्पोरेशनच्या एग्जीक्यूटिव आणि सीईओ झाल्या. 2017 ते 2019 पर्यंत फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट होते. 2019 मध्ये त्या श्रीमंत महिलांच्या यादीत 54 व्या क्रमांकावर होत्या.6 / 82019 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या. कंपनीची जबाबदारी सांभाळताना रोशनी आपला छंद जोपासतात. त्यांना चित्रपटांची आवड आहे. त्या वाइल्ड लाईफ कंजर्वेशनिस्ट आहेत. त्यावर आधारित त्यांनी एनिमल प्लॅनेट अँड डिस्कव्हरीसाठी द ब्रिंक फॉर या टीव्ही सीरीजची निर्मिती केली.7 / 8रोशनी 3 लाख कोटींच्या HCL या कंपनीची जबाबदारी सांभाळतात. याशिवाय शिव नादर फाउंडेशनची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. हरुनच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती 84,330 कोटी रुपये आहे.8 / 8रोशनी यांनी 2009 मध्ये शिखर मल्होत्रा यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांचे पती एचसीएल हेल्थचे वाइस-चेयरपर्सन आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications