शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२००० ₹ पार जाणार ‘या’ सीमेंट कंपनीचा शेअर, तज्ज्ञांनी दिलं बाय रेटिंग; पाहा कोणता आहे हा स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 4:12 PM

1 / 7
सध्या अनेक जण शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळत आहेत. दालमिया भारत (Dalmia Bharat) सिमेंट क्षेत्रातून तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करू शकते. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने स्टॉकवर खरेदीची शिफारस केली आहे. सोमवारी दालमिया भारतचा शेअर 0.57 टक्क्यांनी वाढून 1752.15 रुपयांवर बंद झाला.
2 / 7
ब्रोकरेजच्या रिपोर्टनुसार दालमिया भारतचा स्टॉक येत्या काही दिवसांत 2000 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. कारण, दालमिया भारतचे लक्ष्य दीड पट इंडस्ट्री व्हॉल्युमचे आहे. सिमेंटची मागणी कायम राहणार आहे. सरकारचे लक्ष इन्फ्रावरही आहे. यासोबतच घरांच्या बाबतीतही सुधारणा होताना दिसत आहे.
3 / 7
जर आपण बाजारातील इतर तज्ज्ञांबद्दल बोललो तर ते देखील यावर बुलिश आहेत. 32 पैकी 18 तज्ज्ञांनी दालमिया भारतवर 1,900 रुपयांच्या सरासरी लक्ष्य किंमतीसह मजबूत खरेदीची शिफारस केली आहे.
4 / 7
तर 8 जणांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे त्यांना 4 विश्लेषकांकडून होल्डची शिफारस करण्यात आली आहे. केवळ दोन विश्लेषक या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत.
5 / 7
बीएसईवर कंपनीचे एकूण मार्केट कॅप 32,963.64 कोटी रुपये आहे. दालमिया भारताचा NSE वर 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2104.15 रुपये आहे, जो या वर्षी 21 जानेवारी रोजी गाठता आला होता. तर, 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1212.50 रुपये आहे.
6 / 7
दालमिया ग्रुपची कंपनी असलेल्या दालमिया भारतने गेल्या 5 दिवसांत आपल्या शेअरधारकांना 3.80 टक्के परतावा दिला आहे. तर दालमिया भारतच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 9.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
7 / 7
तर, या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 27.51 टक्के परतावा दिला आहे. मात्र, ज्यांनी हा स्टॉक वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केला होता, त्यांच्या मूल्यात आतापर्यंत 6.89 टक्के घसरण झाली आहे. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरी विषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारbusinessव्यवसाय