शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹96 चा शेअर महिन्याभरात ₹436 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 4.54 लाख रुपये, 355% रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 8:47 PM

1 / 6
Multibagger Stock: काही मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळून देतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने महिन्याभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड (Lotus Chocolate Company Ltd) चा आहे. शेअर गेल्या एका महिन्यापासून अपर सर्किटमध्ये आहे.
2 / 6
लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे शेअर गेल्या एक महिन्यापासून सलग 5% अपर सर्किटला हिट करत आहेत. लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे शेअर आज(मंगळवार)देखील 5% अपर सर्किटसह 325.35 रुपयांवर बंद झाले.
3 / 6
₹96 वरुन ₹435.85 वर पोहचले- कंपनीचे शेअर महीन्याभरात ₹96 रुपयांवरुन वाढून 435.85 रुपयांवर पोहचले आहेत. लोटस चॉकलेटच्या शेअर्सने फक्त एका महीन्यात 355% पेक्षा जास्तीचा मल्टीबॅगर रिटर्न (Stock Return) दिला आहे.
4 / 6
म्हणजेच महिन्याभरापूर्वी एखाद्या व्यक्तीने कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता सूमारे 4.54 लाख रुपये मिळाले असते. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, मुकेश अंबानी यांनी लोटस चॉकलेट कंपनी खरेदी केली आहे.
5 / 6
काही दिवसांपूर्वीच अंबानी यांनी याबाबत घोषणा केली होती. अंबानी ग्रूपच्या रिलायन्स कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) आणि रिलायन्स रिटेल लिमिटेडने लोटस चॉकलेटमध्ये 26 टक्के अतिरिक्त हिस्सा खरेदीच्या ओपन ऑफरची घोषणा केली आहे.
6 / 6
ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 ला सुरू होईल आणि 6 मार्च 2023 ला बंद होईल. कंपनीकडून ओपन ऑफरचे फिक्सड प्राइस 115.50 रुपये ठरवण्यात आले आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारMukesh Ambaniमुकेश अंबानी