Ruchi Soya announces acquisition of Patanjalis biscuits business for Rupees 60 crore
Patanjali : बाबा रामदेव यांच्या 'या' व्यवसायाची होणार विक्री; पाहा कोण खरेदी करणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 3:55 PM1 / 15योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका व्यवसायाची विक्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रुचि सोया इंडस्ट्रिजनं त्यांच्या एका कंपनीचं अधिग्रहण करणार असल्याची माहिती दिली. 2 / 15रुचि सोया ही कंपनी पंतजलीच्या बिस्किट व्यवसायाचं पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेडचं अधिग्रहण करणार आहे.3 / 15१० मे रोजी संचालक मंडळानं बिझनेस ट्रान्सफर अॅग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती कंपनीनं दिली. 4 / 15रुचि सोयानं पतंजलीचा हा व्यवसाय ६०.०२ कोटी रूपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 / 15ही अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल. तसंच या अधिग्रहणाचे पैसे पतंजलीला दोन टप्प्यांमध्ये दिले जातील असं रूचि सोया इंडस्ट्रिजनं स्पष्ट केलं आहे. 6 / 15यापैकी १५ कोटी रूपये कंपनीला अॅग्रीमेंट क्लोझिंग तारखेवर किंवा त्याच्या पूर्वी दिले जातील. तसंच उर्वरित रक्कम म्हणजेच ४५ कोटी रूपये क्लोझिंग तारखेच्या दिवसांच्या आत दिले जातील.7 / 15यामध्ये कंपनीनं काही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग अॅग्रीमेंटही केले आहेत आणि यासह कर्मचाऱ्यांसह कंपनीचे असेट्सही ट्रान्सफर केले जातील. 8 / 15करंट असेट्स आणि लाएबिलिटीसह सर्व लायसन्स आणि परमिट हे रूचि सोया या कंपनीला देण्यात येतील. या अधिग्रहणानंतर कंपनीचा उद्देश सध्याच्या उत्पादनाचा पोर्टफोलिओ अधिक वाढवणं हे आहे.9 / 15रुचि सोया ही कंपनी भारतात न्यूट्रिला, महाकोश, रुचि गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिचसारख्या ब्रँडसोबत व्यवसाय करते. 10 / 15एकेकाळी रुचि सोया ही कंपनी कर्जात बुडाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पतंजली आयुर्वेदनं या कंपनीची खरेदी केली होती. ४३५० कोटी रूपयांना कंपनीनं याची खरेदी केली. 11 / 15यासाठी पतंजलीनं ३२०० कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं. त्यांनी एसबीआयमधून १२०० कोटी, सिंडिकेट बँकेतून ४०० कोटी, पंजाब नॅशनल बँकैतून ७०० कोटी, युनियन बँकेतून ६०० कोची आणि अलाहाबाद बँकेतून ३०० कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. 12 / 15जरी या ठिकाणी एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं अधिग्रहण करताना दिसत असलं तरी दोन्ही कंपन्या या बाबा रामदेव यांच्याच आहे. 13 / 15पतंजलीची सुरूवात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये केली होती. आताही कंपनीचे ९९.६ टक्के स्टेक हे आचार्य बाळकृष्ण यांच्याकडे आहेत. 14 / 15अधिक स्टेक त्यांच्याकडे असले तरी बाबा रामदेव हे कंपनीचे को फाऊंडरदेखील आहेत. 15 / 15जर रुचि सोयाबद्दल सांगायचं झालं तर बाबा रामदेव हे या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव नॉन इंडिपेंडेंट डायरेक्टर (Non Exe.Non Ind.Director) म्हणून कार्यरत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications