शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 8:51 AM

1 / 8
सरकार महिन्याच्या सुरुवातीला मोठे बदल करत असते. नोव्हेंबर महिना संपत आला आहे. दोन दिवसात डिसेंबर महिन्याला सुरुवात होईल.
2 / 8
नवीन महिन्याच्या १ तारखेपासून देशात लागू होणाऱ्या या प्रमुख बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतील सुधारणा आणि क्रेडिट कार्ड संबंधित बदलांचा समावेश आहे.
3 / 8
१ डिसेंबर २०२४ पासून अनेक नियम बदलणार आहेत, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. १ नोव्हेंबरला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमती सुधारतात आणि यावेळी देखील तेच दिसून येईल. अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतात.
4 / 8
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसोबतच एअर टर्बाइन इंधनची किंमतही तेल वितरण कंपन्यांकडून महिन्याच्या एक तारखेपासून बदलले जातात. याचा परिणाम हवाई प्रवाशांवर होतो.
5 / 8
१ डिसेंबर २०२४ पासून तिसरा मोठा बदल क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी संबंधित आहे. तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी विशेषत: SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. SBI कार्ड्स वेबसाइटनुसार, ४८ क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत.
6 / 8
ट्रायने व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची दूरसंचार कंपन्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करायची होती, पण अनेक कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची अंतिम मुदत ३१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
7 / 8
टेलिकॉम कंपन्या ट्रायचा हा नियम १ डिसेंबरपासून लागू करू शकतात. हा नियम बदलण्याचा उद्देश हा आहे की दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे, ग्राहकांना ओटीपी वितरणात विलंब होऊ शकतो.
8 / 8
डिसेंबर महिन्यात बँकांना मोठ्या सुट्ट्या असतात. यामुळे तुमच जर बँकेत काही काम असेलतर आधी तुम्ही बँकांच्या सुट्टीचे वेळापत्रक पाहा.
टॅग्स :bankबँक