शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rule Change from 1st June: १ जूनपासून पाच मोठे बदल होणार; बँका, सोने... तुमच्यावर काय परिणाम होणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 9:40 AM

1 / 7
मे महिना संपायला आला आहे. गॅस सिलिंडरचे दर पुन्हा एकदा ठरविले जाणार आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून दिलासा दिल्याने गॅसचे दर वाढण्याची तशी शक्यता कमी आहे. परंतू, येत्या १ जूनपासून तुमच्या आमच्या आयुष्यातील पाच गोष्टी बदलणार आहेत. बँकेच्या नियमांपासून ते सोन्याच्या खरेदीपर्यंत हे नियम आहेत.
2 / 7
१जूनपासून वाहनांचा विमा महागणार आहे. थर्ड पार्टी विमा वाहनांच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार वाढणार आहे. यामुळे वाहन मालकांच्या खिशावर भार पडणार आहे. यामध्ये चारचाकी, दुचाकींसह सर्व प्रकारच्या वाहनांचा विमा वाढणार आहे.
3 / 7
सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता राखण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी सर्वच दागिन्यांवर हॉ़लमार्क बंधनकारक केला होता. त्याचा दुसरा टप्पा १ जूनपासून सुरु होत आहे.
4 / 7
यानुसार 20, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यांवर हॉमार्किंग सुरु केले जाणार आहे. या मोहिमेत आता ३२ नवीन जिल्हे वाढणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क केंद्र स्थापन केले जाणार आहे. २३ जूनला पहिल्या टप्प्यात 256 जिल्ह्यांत ही मोहिम सुरु करण्यात आली होती.
5 / 7
स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्याजदर ४० बेसिस पॉईंटनी वाढणार आहे. १ जूनपासून एसबीआयच्या होम लोनचा व्याजदर हा 7.05 टक्के होणार आहे. यापूर्वी हा व्याजदर 6.65 टक्के होता.
6 / 7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सांगितले की, आधारबेस पैसे ट्रान्स्फर प्रणालीमध्ये शुल्क लागू करण्यात येणार आहे. हे शुल्क १५ जूनपासून आकारले जाणरा आहे. दर महिन्याला तीन ट्रान्झेक्शन मोफत असणार आहेत. यानंतर प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. मिनी स्टेटमेंटसाठी ५ रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे.
7 / 7
अॅक्सिस बँक १ जूनपासून मोठा बदल करणार आहे. सेव्हिंग खात्यामध्ये निम शहरी आणि ग्रामीण भागात बचत आणि वेतन खात्यांमध्ये सरासरी मासिक बॅलन्स लिमिट १५००० रुपयांवरून २५००० रुपये किंवा एक लाख रुपये करण्यात येणार आहे.
टॅग्स :SBIएसबीआयPost Officeपोस्ट ऑफिसGoldसोनं