शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SEBI Share Buyback New Rules: शेअर बायबॅकचे नियम बदलले! सेबीने कडक केले धोरण; गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 7:08 PM

1 / 9
SEBI Share Buyback New Rules: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होताना दिसत आहेत. सातत्याने घसरण होत चाललेला शेअर मार्केट हळूहळू सावरत असल्याचे दिसून येत आहे. हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आला.
2 / 9
हिंडेनबर्गच्या तडाख्यातून हळूहळू अदानी समूह सावरत असून, गमावलेली संपत्ती परत मिळतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) शेअर बायबॅकच्या नियमात बदल केले आहेत. ९ मार्चपासून हे बदल लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बदललेले नियम महत्त्वाचे मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सेबीने एक परिपत्रक काढले असून, यात बदललेल्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. नियमात बदल करताना सेबीने कठोर धोरण अवलंबल्याचे सांगितले जात आहे. ०७ फेब्रवारी रोजी सेबीने याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले होते.
4 / 9
सेबीने स्टॉक एक्स्चेंजद्वारे शेअर बायबॅक करणाऱ्या कंपन्यांसाठी बोली, किंमत आणि प्रमाण यावर निर्बंध लादले आहेत. एखादी कंपनी ज्या दिवशी शेअर्स खरेदी करते त्या दिवसाच्या आधीच्या १० ट्रेडिंग दिवसांमध्ये तिच्या शेअर्सच्या सरासरी दैनंदिन ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या (मूल्यानुसार) २५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी करू शकत नाहीत.
5 / 9
याशिवाय कंपनी प्री-ओपन मार्केटमध्ये, नियमित ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या ३० मिनिटे आणि शेवटच्या ३० मिनिटांमध्ये बोली लावू शकणार नाही. तसेच कंपनीची ऑर्डर किंमत शेवटच्या ट्रेड केलेल्या किमतीच्या दोन्ही बाजूला १ टक्क्यांच्या मर्यादेत असावी. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर त्याला दंड आणि इतर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले जात आहे.
6 / 9
सेबीने कंपन्या आणि ब्रोकर्सना या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले असून, नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. तसेच कंपन्यांकडे शेअर्स खरेदी करण्यासाठी स्टॉक एक्सचेंज आणि टेंडर ऑफर असे दोन पर्याय आहेत. सेबीने कंपन्यांना तसेच नियुक्त दलालांना तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले.
7 / 9
सेबीने फेब्रुवारीमध्ये शेअर बायबॅकची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, गुंतवणूकदारांना समान ट्रेडिंग क्षेत्र प्रदान करण्यासाठी आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी शेअर बायबॅक नियमांमध्ये सुधारणा केली होती.
8 / 9
यामुळे विद्यमान प्रक्रियेतील त्रुटी दूर होतील. याशिवाय, बायबॅकच्या रकमेपैकी ७५ टक्के स्टॉक एक्स्चेंज मार्गाने वापरावे लागतील, जे आधी ५० टक्के होते. स्टॉक एक्स्चेंजच्या एका वेगळ्या विंडोद्वारे बायबॅक केले जातील जोपर्यंत त्यांना एक्सचेंजेसद्वारे परवानगी दिली जात नाही, असे सांगितले जात आहे.
9 / 9
दरम्यान, अदानी ५४ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीमध्ये २२ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अदानींच्या नेटवर्थमध्ये १.९७ अब्ज डॉलर एवढी वाढ झाली. अदानींच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली होती. अदानी समूहाचा कंबाइंड मार्केट कॅप ९ लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. यामध्ये १७ हजार कोटींची भर पडली.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक