rules for printing currency in india where are indian notes printed what is printed on indian notes
जपानहून येतो कागद अन् स्वित्झर्लंडची शाई...भारतीय नोट कशी बनते माहित्येय? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 2:02 PM1 / 10देशात कोट्यवधी किमतीच्या नोटा चलनात आहेत. पण या नोटांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत? नोटांसाठी लागणारा कागद कुठून येतो आणि छपाई केंद्र कुठे आहे? याची माहिती जाणून घेऊयात..2 / 10देशात नोटांच्या छपाईची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे. 3 / 10देशात एकूण चार ठिकाणी नोट छपाईसाठीच्या प्रिटिंग प्रेस आहेत. 4 / 10देशात पहिली नोट ब्रिटीश सरकारनं १८६२ साली चलनात आणली. या नोटेची छपाई ब्रिटनमध्ये झाली होती. 5 / 10भारतात नोट छपाईची पहिली प्रेस १९२६ साली महाराष्ट्रातील नाशिक येथे सुरू झाली. 6 / 10. त्यानंतर १९७५ साली मध्य प्रदेशच्या देवास येथे देशातील दुसरी नोट छपाईचा कारखाना सुरू करण्यात आला. 7 / 10देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता १९९९ साली कर्नाटकच्या म्हैसूर येथे नोट छपाईचा तिसरा कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर २००० साली पश्चिम बंगालच्या सलबोनी येथे नोट छापण्याची चौथी प्रेस सुरू झाली. 8 / 10नोटांसोबतच नाणी, सरकारी मेडल आणि पुरस्कारांबाबत बोलायचं झालं तर इंडियन गर्व्हनर मिंट द्वारे याची निर्मिती केली जाते. नाणी आणि मेडल मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे तयार केले जातात. 9 / 10भारतीय नोट छापण्यासाठी जो कागद वापरला जातो त्याचा ८० टक्के कच्चामाल जापान आणि ब्रिटनमधून आयात केला जातो. तर उर्वरित २० टक्के माल मध्य प्रदेशच्या होशंगाबाद स्थित पेपर मिलमध्ये तयार केला जातो. 10 / 10भारतीय चलनासाठी लागणारी शाई स्वित्झर्लंडच्या 'सीआयसीपीए' या कंपनीकडून आयात केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications