Russia | Ukraine | War impact on crude oil price, reaches to 117 dollar
Crude Oil : भारताची चिंता वाढली! कच्च्या तेलाने गाठला उच्चांक; 117 डॉलरवर पोहोचला दर By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 9:42 PM1 / 10 रशिया आणि युक्रेनमधील आठ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलावर होत आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने दशकभराचा उच्चांक गाठला.2 / 10 रशिया युक्रेन युद्धामुले कच्च्या तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांहून अधिक वाढ घेऊन, त्याची किंमत प्रति बॅरल $ 117 वर पोहोचली. विशेष म्हणजे ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याने भारतीयांची चिंता वाढली आहे.3 / 10 या संदर्भात नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, OPEC+ देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ होत आहे.4 / 10 गुरुवारी ब्रेंट क्रूडची किंमत $117 वर पोहोचली, तर दुसरीकडे, WTI क्रूडची किंमत 2.67 टक्क्यांनी वाढून $113.6 प्रति बॅरलवर पोहोचली. ब्रेंट क्रूडची किंमत 2011 नंतरची सर्वोच्च आहे.5 / 10 2022 च्या सुरुवातीपासूनच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी वर्षभराचा विक्रम मोडत, ब्रेंट क्रूडची किंमत 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल $ 100 ओलांडली. गेल्या चार महिन्यांपासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. 6 / 10 आकडेवारीवर नजर टाकल्यास, ब्रेंट क्रूडची किंमत डिसेंबरमध्ये 10.22 टक्के, जानेवारीमध्ये 17 टक्के, फेब्रुवारीमध्ये 10.7 टक्के आणि मार्चमध्ये आतापर्यंत 16 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.7 / 10 कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावर दिसून येईल. यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 8 / 10 कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतरही गेल्या चार महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, त्यामागचे कारण देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका सांगण्यात येत आहेत.9 / 10 आता 10 मार्च रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतर देशात त्यांची किंमत वाढू शकते. गुरुवारी आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, लवकरच पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकते.10 / 10 10 मार्च रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांनी वाढ करू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications