Russia Ukraine War | LPG Gas Cylinder | LPG Gas Cylinder price Likely to increase
LPG Gas Cylinder Price: उद्या पहिला बॉम्ब पडणार? रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम दिसण्यास सुरुवात; गॅस दर वाढण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 3:43 PM1 / 8 युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये इंधनासह गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारतातही तेल कंपन्या उद्या म्हणजेच 1 मार्चपासून घरगुती गॅसच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत.2 / 8 एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. तेल आणि एलपीजीच्या किमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत ठरवली जाते.3 / 8 एलपीजीच्या किमतीबाबत विशेषत: पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात. यावेळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणामही या बैठकीत दिसून येईल. अशा स्थितीत भारतातील सर्वसामान्य जनतेलाही या लढ्याचा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.4 / 8 रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसोबतच एलपीजीच्या किमतीतही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरवर गेली आहे. 5 / 8 अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या किमतीही वाढू शकतात, असे तेल-गॅस क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होणार आहे.6 / 8 आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार तेल आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आणि कमी केल्या जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.7 / 8 पण, आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. तसेच, गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. 8 / 8 एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांची मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications