शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia vs Ukraine War: युद्धामुळे बाजारात मंदी, हीच पैसे कमावण्याची संधी; 'या' ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 5:54 PM

1 / 11
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन १० दिवस उलटले आहेत. या १० दिवसांत जगभरातील शेअर बाजारांत खळबळ उडाली. गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. अनेक कंपन्यांचे शेअर घसरले.
2 / 11
युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम BSE आणि NSE मध्येही दिसून आला. गेल्या १० दिवसांत भारतीय गुंतवणूकदारांनी गमावलेली रक्कम युक्रेनच्या जीडीपीइतकी आहे. त्यामुळे उद्यापासून शेअर बाजारात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.
3 / 11
येणारा आठवडा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाता असेल. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन दीड आठवडा उलटला आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या आठवड्यात हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. त्यासोबत पाच राज्यांचे निवडणूक निकाल गुरुवारी जाहीर होतील.
4 / 11
शेअर बाजारात पडझड होते, शेअर्सच्या दरांमध्ये घसरण होते, तीच वेळी गुंतवणुकीसाठी उत्तम असते असं म्हणतात. त्यामुळे या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीमधून पुढे चांगला परतावा मिळू शकतो. मात्र गुंतवणूक करायची कुठे, कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
5 / 11
बाजार वरखाली होत असताना फंडामेंटली मजबूत असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला CNI रिसर्च लिमिटेडचे सीएमडी किशोर ओस्तवाल यांनी दिला आहे. येत्या काळात चांगला परतावा देणारे ५ स्टॉक्स त्यांनी सुचवले.
6 / 11
टाटा पॉवर- हा शेअर या आठवड्यात चर्चेत राहिला. शुक्रवारी बाजार बंद होत असताना NSE वर शेअरची किंमत २२१.५० रुपये होती.
7 / 11
ऍक्सिस बँक- हा शेअरदेखील चर्चेत आहे. शुक्रवारी शेअरच्या किमतीत घसरण झाली. बाजार बंद असताना शेअरचं मूल्य ७१३.७५ रुपयांपर्यंत घसरलं. मात्र येत्या काही दिवसांत तो उत्तम कामगिरी करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
8 / 11
टाटा मोटर्स- टाटा मोटर्सचा शेअर लाँग टर्ममध्ये चांगला परतावा देईल अशी आशा तज्ज्ञांना आहे. शुक्रवारी शेअरची किंमत ४१८.४० रुपये होती.
9 / 11
NALCO- रशिया-युक्रेन युद्धामुळे ऍल्युमिनियमचे दर वाढले आहेत. त्यामुळे या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत १२३ रुपये होती.
10 / 11
बजाज कंझ्युमर्स- बजाज समूहातील कंपन्यांचे शेअर्सदेखील उत्तम परतावा देतात. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमधील या शेअरची किंमत येत्या काही दिवसांत वाढू शकते. शुक्रवारी शेअरची किंमत १६२.३० रुपये होती.
11 / 11
याशिवाय IndusInd Bank, Hindustan Copper, Vipul Organics, GVK Engineering आणि Mahindra and Mahindra Finance च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाshare marketशेअर बाजार