salaried individuals must explore alternative investment options for passive income
नोकरदार वर्गासाठी मस्त टीप्स! पगारासोबतच कशी कराल अधिकची कमाई, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 9:05 AM1 / 9कोरोनाच्या संकटात आर्थिक नियोजन करणं अतिशय महत्वाचं झालंय यात काही दुमत नाही. पण कोरोनामुळे नोकरदारवर्गाला एक चांगलाच धडा मिळाला आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजेच कमाईची इतर माध्यमं हाताशी ठेवून संकट काळात आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठीची तरदूत करणं गरजेचं झालं आहे. 2 / 9आपण अशाच काही 'पॅसिव्ह इन्कम'चे पर्याय जाणून घेणार आहोत की ज्यासाठी फार काही मेहनत करावी लागत नाही. नोकरदार वर्गालाच्या दरमहा वेतनातून काही रक्कम गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. यातूनच कमाईचं नवं साधन निर्माण होऊ शकतं. 3 / 9गेल्या काही वर्षांमध्ये REIT, क्रिप्टोकरंसी, पीअर-टू-पीअर लेन्डिंगची क्रेझ खूप वाढली आहे. पण असं असलं तरी कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. गुंतवणूक करत असलेल्या पर्यायाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आधीच जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. 4 / 9शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे दोन पारंपारिक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. कोरोना काळात यात गुंतवणुकदारांचं प्रमाण देखील खूप वाढलं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणं खूप जोखमीचं तर असतंच पण व्यवस्थित माहिती घेऊन आणि हुशारीनं गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा होतो. 5 / 9तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही विविध सेक्टरमधील मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचा समावेश केला तर स्मार्ट पद्धतीनं तुम्ही मिळणारे रिटर्न्सचं व्यवस्थापन करू शकता. म्युच्युअल फंड देखील सुरक्षित पर्याय आहे. पण इक्विटी फंडमध्ये जास्त जोखीम असते. 6 / 9शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त पीअर-टू-पीअर लेडिंग देखील एक बचतीचा उत्तम पर्याय आहे. याशिवाय लीज फायनासिंग, वेंचर कॅपिटल, फ्रॅक्शनल इन्हेन्स्टमेंट, REIT सारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. 7 / 9P2P लेंडिंगच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला बिझनेस लोन स्वरुपात आर्थिक मदत करू शकता. यात तुम्हाला व्याज देखील मिळतं आणि लोन रिपमेंटच्या स्वरुपात तुम्हाला तुम्ही केलेली गुंतवणूक देखील परत मिळते.8 / 9वेंचर कॅपिटलच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यावसायिकाच्या कल्पनेवर गुंतवणूक करू शकता. व्यवसायाची कल्पना दुसऱ्याची आणि त्यासाठी तुमची आर्थिक मदत अशापद्धतीनं तुम्ही नियोजन करुन नवा मिळकतीचा मार्ग मिळवू शकता. 9 / 9गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकीत भरमसाट वाढ होण्याचं कारण म्हणजे बचत खाते किंवा मुदत ठेव या पारंपारिक पर्यायांमध्ये मिळणाऱ्या व्याजात घट झाली आहे. त्यामुळे आता गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कारण यात तुम्हाला रिटर्न्स खूप चांगले मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications