शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI ची डिजिटल बँकिंग सेवा उद्या बंद राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 9:54 PM

1 / 8
शनिवारी (दि. 22) बँकिंगचे काम संपल्यानंतर बँक आपल्या NEFT सिस्टमला अपग्रेड करणार असल्याची माहिती एसबीआयने (SBI) दिली आहे. 17 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने NEFT अपग्रेडसाठी बँकांना पत्र लिहिले होते. यामुळे 23 मे रोजी बँकाची डिजिटल बँकिंग सेवा विस्कळीत होईल.
2 / 8
एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 22 मेच्या मध्यरात्री ते 23 मे 2021 रोजी दुपारी 2 पर्यंत या बँकेची सेवा उपलब्ध नसेल. अशा प्रकारे बँकेची डिजिटल सेवा जवळपास 14 तास उपलब्ध होणार नाही.
3 / 8
NEFT सिस्टमला अपग्रेड करण्यासाठी बँकेच्या NEFT सेवेसह Yono, Yono Lite, नेट बँकिंग सेवा देखील उपलब्ध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
4 / 8
बँकेने आपल्या सार्वजनिक नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, या सिस्टम अपग्रेडमुळे त्यांच्या RTGS सेवेवर परिणाम होणार नाही आणि हे पूर्वीप्रमाणेच काम करेल. RTGS साठी अशाप्रकारे अपग्रेडेशन याआधी 18 एप्रिल 2021 रोजी झाले आहे.
5 / 8
RTGS चालू असल्याचे बँकेने 22 मेच्या नोटिसमध्ये स्पष्ट केले आहे, परंतु UPI पेमेंटबाबत काहीही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, बँकेने UPI च्या सेवा विस्कळीत होण्याची सूचनाही दिली नाही.
6 / 8
कालही इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI सारख्या एसबीआयच्या काही सेवाही विस्कळीत झाल्या होता. बँकेच्या सेवांच्या देखभाल दुरुस्तीसाठी बँकिंग सेवा विस्कळीत झाली होती, असे एसबीआयने म्हटले होते.
7 / 8
एसबीआयने UPI संबंधित 22 मे रोजी दिलेल्या नोटीसमध्ये कदाचित माहिती दिली नसेल, परंतु 21 मेच्या नोटीसमध्ये म्हटले होते की, इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPIची सेवा 23 मे रोजी 2 वाजून 40 मिनिटांपासून ते 6 वाजून 10 मिनिटापर्यंत या वेळेत उपलब्ध नसणार आहे.
8 / 8
या आठवड्याच्या सुरूवातीला एसबीआयने सांगितले होते की, 31 मे पर्यंत बँकांचा शाखा दिवसात फक्त चार तास सुरू होतील. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बँक शाखांमध्ये काम केले जाईल.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआयbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकdigitalडिजिटलMONEYपैसा