शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI ने ग्राहकांना केले सावध! मोबाइलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर बँक खाते होऊ शकते रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 9:44 AM

1 / 8
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये (State Bank Of India) जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेने देशातील 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केले आहे.
2 / 8
SBI च्या वेबसाइटनुसार, देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वांनी सावध असणे गरजेचे आहे. याशिवाय, तुम्ही कधीही तुमच्या बँक खात्यासंबंधी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवू नये.
3 / 8
जर तुम्ही तुमचा OTP, पिन नंबर, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा CVV किंवा एटीएम डिटेल्स सेव करुन ठेवल्या असतील तर ते लगेचच डिलिट करा, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामी होऊ शकते.
4 / 8
ग्राहकांनी ही चूक अजिबात करू नये, ज्यामुळे बँक खाते रिकामे होईल, असे SBI ने म्हटले आहे. तसेच, बँकेने माहिती देताना सांगितले की, कधीही आपले बँक खाते किंवा ऑनलाईन बँकिंग डिटेल्स फोनमध्ये सेव्ह ठेवू नका.
5 / 8
बँकेने म्हटले आहे की, बँक खाते नंबर, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर किंवा याचा फोटो काढून ठेवल्यामुळेदेखील तुमची माहिती लिक होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे खाते देखील पूर्णपणे रिकामे होऊ शकते.
6 / 8
याशिवाय ग्राहकांनी एटीएम कार्डदेखील इतरांसोबत शेअर करणे टाळायला पाहिजे. यामुळे तुमच्या कार्डची माहिती सहज लीक होऊ शकते आणि तुमची कोणीही सहजरित्या फसवणुक करू शकते.
7 / 8
स्टेट बँकच्या म्हणण्यानुसार, देशातील सगळ्या ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की पब्लिक इंटरनेटचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी करू नये. यामध्ये तुमची खासगी माहिती लीक होण्याची भीती अधिक असते.
8 / 8
दरम्यान, बँक कधीही तुम्हाला फोन किंवा एसएमएसच्या माध्यमातून यूजर आयडी, पिन, पासवर्ड, सीवीवी, ओटीपी, यूपीआय यासारखी संवेदनशील माहिती मागत नाही. त्यामुळे, अशा गोष्टींची विचारणा करणारा फोन तुम्हाला आल्यास सावधान राहा आणि कोणतीही माहिती सांगू नका.
टॅग्स :MONEYपैसाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआय