sbi atm new rule withdraw cash from atm using otp to avoid fraud
कोट्यवधी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी SBI चं मोठं पाऊल; ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 2:28 PM1 / 10स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम कार्डधारकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. एक नवीन सुविधा दिली आहे. या निर्णयामागे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचे सायबर गुन्हे कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. 2 / 10एसबीआयने आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये लाँच केली आहेत. जेणेकरुन आर्थिक गरजांसोबतच सुरक्षिततेची काळजी घेतली जाऊ शकते. कोट्यवधी ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 3 / 10एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने ओटीपी आधारित व्यवहार (SBI ATM New Rule) सादर केला आहे. या नवीन प्रणालीच्या वापरात, ग्राहक केवळ ओटीपीच्या आधारे एटीएममधून पैसे काढू शकतील. 4 / 10ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल. ज्याच्या आधारे एटीएममधून पैसे काढता येतील. त्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल. एटीएम क्लोनिंग किंवा इतर फसवणूक टाळली जाईल कारण ओटीपीशिवाय रोख व्यवहार होणार नाहीत. 5 / 10एटीएममध्ये मोबाईल फोनवरील ओटीपी टाकल्यानंतरच पैसे काढता येतील. स्टेट बँकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे बँकेने म्हटले आहे. 6 / 102020 मध्ये, SBI ने सुरक्षा लक्षात घेऊन OTP आधारित ATM व्यवहाराची प्रणाली (SBI ATM नवीन नियम) सुरू केली. हीच यंत्रणा यावेळी रीफ्रेश करण्यात आली असून सुरक्षेच्या अधिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.7 / 10रोख रक्कम काढण्यापूर्वी, ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल ज्याची एटीएममध्ये पडताळणी करावी लागेल. जर हा ओटीपी एटीएममध्ये पडताळला नसेल तर पैसे काढले जाणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा की रोख रक्कम काढण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल तुमच्याकडे ठेवा.8 / 10हा नियम फक्त एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड असलेल्यांसाठी आहे. जर तुमच्याकडे दुसऱ्या बँकेचे कार्ड असेल आणि तुम्ही SBI ATM मधून पैसे काढत असाल तर OTP ची गरज भासणार नाही. 9 / 10तुम्ही SBI चे कार्डधारक असाल पण इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्ही OTP सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. SBI कार्डसोबत SBI चे ATM असायला हवे. या स्थितीत ओटीपी आधारित एटीएम व्यवहार होईल.10 / 10एसबीआय कार्डमधून पैसे काढण्यासाठी ग्राहक एसबीआय एटीएममध्ये जाताच त्याच्या मोबाईलवर 4 अंकी ओटीपी पाठवला जाईल. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर एक विंडो उघडेल ज्यामध्ये ओटीपी टाकावा लागेल. यामुळे ओटीपीची पडताळणी होईल आणि एटीएममधून पैसे काढले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications