शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट! आजच करून टाका 'हे' काम नाहीतर भरावा लागेल तब्बल 10 हजार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:40 PM

1 / 14
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. तुमचं अकाऊंट आहे आणि तुम्ही मोठे व्यवहार करत असाल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
2 / 14
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. याआधी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता ही तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
3 / 14
30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. अर्थात तुम्ही कोणत्याही कामाकरता त्या कार्डाचा वापर करू शकत नाही. आयकर, इन्कम टॅक्स रिटर्न, विविध बँकिंग सेवा, सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
4 / 14
SBI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'आम्ही ग्राहकांना असा सल्ला दतो की त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करावे, जेणेकरुन कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्यांना अडथळा न येता बँकिंग सेवा अनुभवता येतील' असं म्हटलं आहे.
5 / 14
तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास दंड भरावा लागण्याचीही शक्यता अधिक आहे. तसेच पॅन कार्ड पुन्हा सक्रीय करण्यासाठी तुम्हाला जवळपास 1000 रुपयांची लेट फीज देखील द्यावी लागणार आहे.
6 / 14
पॅन कार्ड निष्क्रिय झाले म्हणजे असे मानण्यात येईल की कायद्यानुसार पॅन कार्ड कोट करण्यात आले नाही. त्यामुळे अशातच आयकर कायदा 272B अंतर्गत तब्बल 10,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
7 / 14
तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाईटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरता तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर https://www.incometax.gov.in/ जा.
8 / 14
त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 14
बँकेच्या नावाने अनेकदा खोटे फोन केले जातात. तसेच पिन, ओटीपी आणि महत्त्वाचे तपशील मागितले जातात. यामुळे फसवणुकीची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा फेक मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.
10 / 14
भारतीय स्टेट बँक (SBI) सह देशातील सर्व सरकारी बँका घरबसल्या बँकिंग सेवा (Banking Services) उपलब्ध करुन देत आहेत. बँकांनी डोर स्टेप बँकिंगसाठी (Door Step Banking) टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.
11 / 14
या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातून बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. ही बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन लांब रांगा लावण्याची गरज नाही. डोर स्टेप बँकिंगमध्ये बँका पैसे काढणे आणि जमा करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
12 / 14
बँकांच्या डोर स्टेप सेवेसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत नोंदणी करावी लागणार आहेत. तुम्ही बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता. डोर स्टेप सेवा देण्यासाठी बँकांनी बँकिंग एजंट्सची नेमणूकही केली आहे.
13 / 14
डोर स्टेप बँकिंगबाबत अधिक माहिती हवी असल्यास www.psbdsb.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे संपूर्ण माहिती मिळेल. DSB mobile App च्या माध्यमातून ही डोर स्टेप बँकिंगची सुविधा घेता येणार आहे.
14 / 14
या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बॅक ऑफ इंडियाbankबँकMONEYपैसाPan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्ड