SBI Clerk 2021 Admit Card: स्टेट बँकेत क्लार्क पदासाठी ५ हजार जागांवर भरती, अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 3:02 PM
1 / 10 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) क्लार्क पदावरील भरतीसाठीच्या परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. एसीबीआयमध्ये क्लेरिकल कॅडरच्या ज्युनिअर असोसिएट पदावर ५ हजाराहून अधिक जागांवर भरती केली जाणार आहे. 2 / 10 इच्छुक उमेदवारांना बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. 3 / 10 एसबीआयकडून जारी करण्यात आलेल्या या भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली होती. यात उमेदवारांना २० मे पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. 4 / 10 बँकेतील भरतीसाठीचं अॅडमिट कार्ड १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीनं संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 5 / 10 शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद आणि नाशिक येथील परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. 6 / 10 एसबीआय क्लर्क भरतीसाठीचं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी sbi.co.in या वेबसाइट्सवर भेट द्यावी. यात SBI Clerk Prelims Admit Card 2021 या पर्यायावर क्लिक करा. यावर विचारण्यात आलेली सर्व माहिती उमेदवारांनी भरावी. 7 / 10 लॉगइन करताच अॅडमिट कार्ड ओपन होईल. ते डाऊनलोड करुन तुम्हाला त्याची प्रिंट काढता येईल. 8 / 10 बँकेची परीक्षा दोन टप्प्यात केली जाते. यात उमेदवाराला सर्वात आधी प्रीलिम्स परीक्षा द्यावी लागते. त्यात निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरं जावं लागतं. एसबीआयच्या क्लार्क पदासाठी मुलाखत घेतली जात नाही. 9 / 10 प्रीलिम्स परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो. त्यानुसार १०० गुणांचा पेपर तयार केला जातो. यात इंग्रजी भाषेवर ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूटचे ३५ प्रश्न आणि रिजनिंग अॅबिलिटी संदर्भात ३५ प्रश्न विचारले जातात. यासाठी एकूण ६० मिनिटांचा अवधी दिला जातो. 10 / 10 मुख्य परीक्षेसाठी ४० मिनिटांचा अवधी असतो. यात १९० प्रश्न विचारले जातात. एकूण २०० गुणांचा पेपर असतो. याच चार विभाग केलेले असतात. आणखी वाचा