SBI customers ALERT State Bank of India changes rules timings know details here
SBI customers ALERT: बँक उघडण्याची, बंद होण्याची वेळ बदलली, होणार फक्त चार कामं; पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 1:45 PM1 / 15सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका मात्र टळलेला नाही.2 / 15कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्यानं पावलं उचलत आहे. 3 / 15दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेनं आता आपल्या ब्रान्च उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा बदलल्या आहेत. 4 / 15ब्रान्चच्या वेळांव्यतिरिक्त आता बँकेत ठराविक चार कामंच केली जाणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. 5 / 15ग्राहकांना अतिशय आवश्यक काम असेल तर त्यांनी बँकेमध्ये यावं असं ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. 6 / 15याशिवाय ग्राहकांनी ३१ मे पर्यंत सकाळी १० ते १ या दरम्यानच बँकेत यावं, २ वाजता सर्व शाखांमधील कामकाज बंद होईल, असंही सांगण्यात आलं आहे. 7 / 15स्टेट बँकेच्या शाखा आता सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच खुल्या राहतील, असं बँकेनं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.8 / 15तसंच बँकेची प्रशासनिक कार्यालयं ५० टक्के कर्मचाऱ्यांसह पहिल्याप्रमाणे पूर्ण बँकिंगच्या वेळेत उपलब्ध राहतील, असंही सांगण्यात आलं आहे. 9 / 15बँकेत येणआऱ्या ग्राहकांसाठी प्रेवश करताना मास्क परिधान केलेलं असणं बंधनकारण करण्यात आलं आहे. त्याशिवाय ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जाणार नाही. 10 / 15स्टेट बँकेनं ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत आता चारच कामं केली जाणार आहेत. 11 / 15यामध्ये रोख रक्कम काढणं अथवा भरणं, चेकशी निगडीत कामं, DD-RTGS-NEFT शी निगडीत कामं आणि सरकारी चालान इतकीचं कामं केली जातील.12 / 15स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना फोन बँकिंग सेवेचा फायदा घेता येणार आहे.13 / 15फोन बँकिंग सेवा सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना नोंदणी करणँ आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकांना पासवर्ड तयार करावा लागतो. 14 / 15ग्राहक संपर्क केंद्राच्या माध्यमातून फोनवर बँकेशी निगडीत माहिती मिळवता येऊ शकते.15 / 15तसंच चेकबुक हवं असल्यास घसबसल्याही ते मागवता येणं शक्य आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications