शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBIच्या ग्राहकांनी लक्ष द्या! असा होतोय ऑनलाइन फ्रॉड, अनावधानानंही करू नका ही चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:19 AM

1 / 5
जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अलीकडेच SBI च्या ग्राहकांसोबत होणारा एक नवा फ्रॉड समोर आलाय.
2 / 5
यामध्ये एका व्यक्तीची ९.६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
3 / 5
दरम्यान, एका व्यक्तीनं आपण स्टेट बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगत ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीला कॉल करण्यात आला आणि त्यांना आपण बँक एजंट असल्याचं सांगितलं. असा प्रकारच्या घटनानंतर संबंधित व्यक्तीची खासगी माहिती गोळा करण्यात येते आणि नंतर फसवणूक केली जाते.
4 / 5
कोणासोबतही पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नका. सोबतच बँकांशी निगडीत कोणतीही माहिती शेअर करू नका. जर कोणीही तुमच्याकडे फोन करून ऑनलाइन बँकिंगची माहिती विचारली तर त्याची माहिती पोलीस आणि बँकेकडे द्यावी.
5 / 5
इंटरनेट बँकिंग पर्सनल कम्प्युटर किंवा मोबाईल फोनद्वारेच करा किंवा ज्या कंम्प्युटरवर आधीपासून वापर करत असाल तर त्यामध्ये अँटी व्हायरसचा वापर करा. ज्या पीसीमध्ये तुम्ही हा वापर कराल त्यात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम असावी. इंटरनेट बँकिंगसाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाfraudधोकेबाजी