शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:50 PM

1 / 9
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात बदल केला आहे. बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी आणि २ कोटी रुपयांपेक्षा जास्त अशा दोन्ही FD योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
2 / 9
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर बुधवार, १५ मे २०२४ पासून लागू झाले आहेत. SBI ने २ कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD योजनांवरील व्याजदरात ७५ बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे.
3 / 9
बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींच्या FD योजनांवरील व्याजदरात मोठा बदल केला आहे. ४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंतच्या FD योजनांवर ७५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य ग्राहकांना ४.७५ टक्क्यांऐवजी ५.५० टक्के व्याजदर मिळत आहे.
4 / 9
ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ५.२५ टक्क्यांऐवजी ६ टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. बँकेने १८० ते २१० दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात २५ आधार अंकांची वाढ केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना आता ५.७५ टक्क्यांऐवजी ६ टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.
5 / 9
२११ दिवसांपासून ते १ वर्षांपर्यंतच्या FD योजनांवर, बँक सर्वसामान्य ग्राहकांना ६.०० टक्क्यांऐवजी ६.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.७५ टक्के व्याजदर देत आहे.
6 / 9
रिटेल व्यतिरिक्त स्टेट बँकेने बल्क एफडीच्या व्याजदरातही बदल केला आहे. बँकेने ७ ते ४५ दिवसांच्या FD योजनेवरील व्याजदरात २५ आधार अंकांची वाढ केली आहे. आता बँक सर्वसामान्य ग्राहकांना ५.०० टक्क्यांऐवजी ५.२५ टक्के व्याजदर देत आहे.
7 / 9
ज्येष्ठ नागरिकांना ५.५० टक्क्यांऐवजी ५.७५ टक्के व्याजदर देत आहे. बँकेने ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात ५० आधार अंकांची वाढ केली आहे. आता या काळात बँक सर्वसामान्य ग्राहकांना ५.७५ टक्क्यांऐवजी ६.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.२५ टक्क्यांऐवजी ६.७५ टक्के व्याजदर देत आहे.
8 / 9
बँकेने १८० ते २१० दिवसांच्या बल्क एफडीच्या व्याजदरात १० आधार अंकांची वाढ केली आहे. आता ते सर्वसामान्य ग्राहकांना ६.५० टक्क्यांऐवजी ६.६० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्क्यांऐवजी ७.१० टक्के व्याजदर देत आहे.
9 / 9
बँकेने १ ते २ वर्षांच्या बल्क एफडी योजनेवरील व्याजदरात २० बेस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते या कालावधीत ग्राहकांना ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याजदर देत आहे. २ ते ३ वर्षांच्या FD वर ५० बेस पॉईंट्सची वाढ झाली आहे, आता सर्वसामान्य ग्राहकांना ७ टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याजदर दिले जात आहे.
टॅग्स :SBIएसबीआयbankबँक