sbi gives relief to customers now branch will be able to change online step by step yono sbi
SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा; आता ऑनलाइन बदलता येणार ब्रान्च, पाहा प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 11:53 AM1 / 11स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of india) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. जर एखाद्या ग्राहकाला आपलं खातं असलेल्या बँकेची ब्रान्च बदलायची असेल तर त्यांच्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही.2 / 11घरबसल्या कोणतीही व्यक्ती आपली ब्रान्च बदलू शकतो. स्टेट बँकेनं कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. 3 / 11सर्वप्रथम ग्राहकाला स्टेट बँकेची अधिकृत वेबसाईट Onlinesbi.com यावर लॉग इन करावं लागेल. 4 / 11त्यानंतर पर्सनल बँकिंह ऑप्शन सिलेक्ट करून युझरनेम आणि पासवर्ड टाका.5 / 11त्यानंतर ई सर्व्हिस टॅबवर क्लिक करून ट्रान्सफर सेव्हिंग अकाऊंटवर क्लिक करा. 6 / 11त्यानंतर तुम्हाला जो अकाऊंट ट्रान्सफर करायचा आहे तो सिलेक्ट करा.7 / 11यानंतर तुम्हाला ज्या ब्रान्चमध्ये तुमचा अकाऊंट ट्रान्सफर करायचा आहे त्या बँकेचा आयएफएससी कोड त्या ठिकाणी टाका.8 / 11तुमच्या डिटेल्स तपासून कन्फर्म करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो टाकून पुन्हा एकदा कन्फर्म करा.9 / 11ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर तुमच्या खात्याच्या ट्रान्सफरची संपूर्ण माहिती देईल.10 / 11ऑनलाइनशिवाय ग्राहकांना कस्टमर योनो एसबीआ, योनो लाईटद्वारेही आपल्या खात्याची ब्रान्च बदलता येणार आहे. 11 / 11ही संपूर्ण प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होऊ शकेल जेव्हा ग्राहकाचा मोबाईल क्रमांक त्यांच्या खात्याशी लिंक असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications