शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अलर्ट! SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी मोठी बातमी; 30 सप्टेंबरला बंद होणार 'ही' सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:20 PM

1 / 12
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. 30 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची सुविधा बंद होणार आहे.
2 / 12
SBI, HDFC, ICICI या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 सप्टेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली होती.
3 / 12
ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते.
4 / 12
बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विशेष एफडी योजना आहे. जी आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती, त्यानंतर ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
5 / 12
त्यानंतर आता 31 मार्चपर्यंत, मार्चनंतर ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती, त्यामुळे तारीख आणखी वाढवली जाण्याची आशा कमी असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
6 / 12
सध्या सर्वसामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी एसबीआयमध्ये 5.4 टक्के व्याजाचा लाभ मिळतो.
7 / 12
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेंतर्गत एफडी घेतली तर त्याला 6.20% व्याज मिळते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे.
8 / 12
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा (HDFC Senior Citizen Care) सुरू केली. बँक या ठेवींवर 0.75 टक्के अधिक व्याज देते.
9 / 12
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत मुदत ठेव केली तर एफडीवर 6.25% व्याजदर लागू असेल.
10 / 12
बँक ऑफ बडोदा (5 वर्षे ते 10 वर्षे) च्या विशेष FD योजनेंतर्गत, ज्येष्ठ नागरिकाने मुदत ठेव केल्यास FD वर 6.25 टक्के व्याज लागू असेल.
11 / 12
ICICI बँकेने ICICI बँक गोल्डन इयर्स योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष FD योजना सादर केली आहे. बँक या योजनेमध्ये 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे.
12 / 12
आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याजदर देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :SBIएसबीआयICICI Bankआयसीआयसीआय बँकbankबँकhdfc bankएचडीएफसीIndiaभारत