शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI चा ग्राहकांना पुन्हा एकदा झटका, लोन महागलं; पण ३१ तारखेपर्यंत घेता येणार ‘या’ स्कीमचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 2:20 PM

1 / 7
SBI new MCLR Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्‍क्‍यांनी वढ केली आहे. एका वर्षाच्या मुदतीच्या कर्जावर ही वाढ करण्यात आली आहे.
2 / 7
दरम्यान, SBI एक फेस्टिव्ह ऑफर चालवत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर काही सूट दिली जात आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
3 / 7
SBI च्या या वाढीनंतर होम, कार आणि पर्सनल लोन ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. तसेच नवीन घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घेणे महाग होईल कारण व्याज पूर्वीपेक्षा जास्त असेल. हे नवे व्याजदर 15 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
4 / 7
नव्या दरानुसार एका वर्षाचा एमएलसीआर आता 8.30 टक्क्यांवरून 8.40 टक्के झाला आहे. अन्य कालावधीच्या एमएलसीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
5 / 7
एसबीआयचा ओव्हरनाईट एमएलसीआर 7.85 टक्के आहे. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी एमएलसीआर 8 टक्के आहे. सहा महिने आणि एका वर्षासाठी एमएलसीआर 8.05 टक्के आहे. दोन वर्षासाठी एमएलसीआर 8.25 टक्के आणि तीन वर्षांसाठी एमएलसीआर 8.35 टक्क्यांवरून वाढून 8.60 टक्के झाले आहे.
6 / 7
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर हा दर 6.25 टक्के झाला आहे. यानंतर बहुतांश बँकांनी MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात 40 बेसिस पॉइंट्स, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
7 / 7
त्यानंतर पुन्हा आरबीआयने रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली असून, ही पाचव्यांदा वाढ करण्यात आली आहे. एकूणच, मे 2022 पासून आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.
टॅग्स :SBIएसबीआयReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक