sbi icici bank and hdfc bank are important institutions in the system reserve bank of india
तुमचंही SBI, ICICI Bank आणि HDFC Bank मध्ये खातं आहे?, तर जाणून घ्या; RBI नं दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 11:09 AM1 / 6Reserve Bank Of India: तुमचे स्टेट बँक (State Bank Of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) किंवा एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) खाते असल्यास तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने या तिन्ही बँकांबद्दल मोठी माहिती दिली आहे.2 / 6भारतीय स्टेट बँकेसोबत खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या देशांतर्गत स्तरावर सिस्टमॅटिकली महत्त्वाच्या बँक (D-SIB) आहेत. या संस्था इतक्या महत्त्वाच्या आहे की यांच्या अपयशाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय.3 / 6SIB अंतर्गत येणाऱ्या बँका महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्यांच्या अपयशाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या कल्पनेच्या आधारे या बँकांना संकटकाळी सरकारकडून मदत अपेक्षित आहे. या धारणेमुळे या बँकांना फायनान्सिंग मार्केटमध्ये काही फायदा होतो.4 / 6रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, 'स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि HDFC बँक या देशांतर्गत प्रणालीदृष्ट्या महत्त्वाच्या बँका आहेत. हे २०२० च्या D-SIB च्या सूचीप्रमाणेच आहे.'5 / 6D-SIB साठी अतिरिक्त शेअर्ड इक्विटी कॅपिटल (टियर १) आवश्यकता १ एप्रिल २०१६ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली आणि १ एप्रिल २०१९ पासून पूर्णपणे प्रभावी झाली. अतिरिक्त CET १ आवश्यकता कॅपिटल कन्झर्व्हेशन बफर व्यतिरिक्त असेल.6 / 6२०१५ आणि २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने SBI आणि ICICI बँकेचा D-SIB च्या श्रेणीमध्ये समावेश केला होता. बँकांकडून प्राप्त झालेल्या डेटाच्या आधारे मार्च २०१७ पर्यंत HDFC बँकेचा देखील D-SIB श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्याचे अपडेट ३१ मार्च २०२१ पर्यंत बँकांकडून प्राप्त झालेल्या डेटावर आधारित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications