MODS अंतर्गत SBI मध्ये उघडा अकाऊंट, बचत खात्यापेक्षा मिळेल अधिक व्याज; पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:50 AM
1 / 15 बँकेत जर आपले पैसे बचतीच्या रूपात म्हणजेच सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा केले तर त्यावर लिक्विडिटी मिळते. परंतु त्यावर व्याज कमी देण्यात येतं. 2 / 15 सेव्हिंग अकाऊंटपेक्षा अधिक व्याज हे टर्म डिपॉझिटवर मिळतं. परंतु त्यात लिक्विडिटी नसते. याचाच अर्थ टर्म डिपॉझिट्स करण्यावर एका ठराविक कालावधीनंतच तुम्ही पैसे काढू शकता. 3 / 15 अशातच भारतीय स्टेट बँकेचा मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम (MODS) हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 4 / 15 MODS हे एका टर्म डिपॉझिट प्रमाणे आहे, जे बचत किंवा चालू (करंट) खात्याशी जोडलेलं असतं. सामान्य टर्म डिपॉझिटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ते पूर्ण बंद करावं लागतं. 5 / 15 परंतु MODS खात्यातून एक हजार रूपयांच्या गुणाकारात तुम्ही आवश्यक ती रक्कम काढू शकता. पैसे काढल्यानंतर त्यात जे पैसे उरतील त्यावर टर्म डिपॉझिटच्या दरानं व्याज मिळतं. 6 / 15 हे व्याज बँकेद्वारे ठराविक कालावधीसाठई ठरवण्यात येतं. MODS खातं उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रान्चशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईनही खातं उघडू शकता. 7 / 15 या खात्यात कमीतकमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी रक्कम जमा केली जाऊ शकते. 8 / 15 MODS अंतर्गत किमान १० हजार रूपयांनी खातं सुरू करता येऊ शकतं. यानंतर १ हजार रूपयांच्या गुणाकारात यात रक्कम भरावी लागेल. 9 / 15 या खात्यात जास्तीतजास्त किती रक्कम भरता येईल याची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. 10 / 15 खात्यातील रकमेवर टर्म डिपॉझिटप्रमाणेच व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५ टक्क्यांनी अधिक व्याज देण्यात येतं. 11 / 15 दरम्यान, यात कोणत्याही व्यक्तीला तुम्ही नॉमिनी ठेवू शकता. तसंच यावर कर्ज घेण्याचीही सुविधा देण्यात येते. 12 / 15 जर ठराविक कालावधीदरम्यान तुम्ही एमओडी तोडली तर जेवढी रक्कम काढली असेल त्यावर त्या कालावधीसाठी मिळणाऱ्या व्याजावर दंडासह रक्कम भरावी लागेल. उर्वरित रकमेवर ठरल्याप्रमाणे व्याज देण्यात येईल. 13 / 15 एका ब्रान्चमधून दुसऱ्या ब्रान्चमध्ये हे खातं ट्रान्सफरही करता येऊ शकतं. जर तुमच्या खात्यात ३५ हजार रूपयांचा किमान बॅलन्स असेल तर तो ऑटोस्वीप (१० हजार रूपये) असेल. 14 / 15 MODS शी जोडलेल्या खात्यात किमान रक्कम ३ हजार रूपये ठेवावी लागेल. त्यावर ती बँक कोणत्या ठिकाणी या आहे याचं बंधन नसेल. 15 / 15 जर ही रक्कम कमी असेल तर सिस्टम स्वत: एमओडी तोडून किमान रक्कम जमा करेल. जर यात किमान रक्कम नसेल तर ग्राहकाला त्यावर दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम ही बँक कोणत्या ठिकाणी आहे यावर अवलंबून असेल. आणखी वाचा