sbi monsoon dhamaka offer for new home buyers nil processing fee home loan
SBI ची मान्सून धमाका ऑफर, गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कावर 100 टक्क्यांची सूट! By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 3:26 PM1 / 9जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तेही गृहकर्ज घेऊन तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी बचतीच्या दृष्टीने चांगला ठरेल. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवीन गृहकर्ज ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फी (PF) मध्ये 100% सूट जाहीर केली आहे.2 / 9एसबीआयने ऑगस्ट महिन्यात गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कावर (प्रोसेसिंग फीस) 100% सूटसह 'मान्सून धमाका ऑफर' देखील जाहीर केली आहे. 3 / 9ही ऑफर नवीन घर खरेदीदारांसाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत उपलब्ध असेल. म्हणजेच, या महिन्यात तुम्ही गृहकर्जावरील विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकता.4 / 9खरंतर, 1 ऑगस्टपूर्वी बँक गृहकर्जावर 0.40 टक्के प्रक्रिया शुल्क आकारत होती. परंतु आता प्रक्रिया शुल्कामध्ये (पीएफ) 100% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 5 / 9बँकेचे म्हणणे आहे की, या मर्यादित कालावधीच्या ऑफरद्वारे गृहकर्ज ग्राहकांना खूप फायदा होईल.6 / 9देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या मते, घर खरेदी करण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ असू शकत नाही, कारण एसबीआय गृहकर्जाचे व्याज दर फक्त 6.70 टक्क्यांपासून सुरू होते. जे त्याच्या ऐतिहासिक नीचांकावर आहे.7 / 9एसबीआयचे एमडी सीएस शेट्टी म्हणाले की, बँकेने ही ऑफर सुरू करून ग्राहकांना भेट दिली आहे. या ऑफरमुळे रिअल्टी क्षेत्रातील घरे आणि फ्लॅटच्या विक्रीला गती मिळेल, अशी बँकेला अपेक्षा आहे. चांगल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या ग्राहकांना कमी व्याज दर देखील दिले जात आहेत.8 / 9दरम्यान, यापूर्वी एसबीआयने जानेवारीमध्ये गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याची ऑफर दिली होती. त्या वेळी बँकेने म्हटले होते की, कर्जाची रक्कम आणि चांगला सिबिल स्कोअरच्या आधारावर दिलेली गृहकर्जे अधिक आकर्षक बनवण्यात आली आहेत.9 / 9एसबीआयने आपल्या गृहकर्जाचे व्याज दर सिबिल रेटिंगशी जोडले आहेत आणि 30 लाख रुपये आणि त्यावरील कर्जासाठी व्याज दर खूप कमी आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, देशातील आठ शहरांमध्ये 5 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पुढील व्याज दिले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications