शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI Mutual Fund IPO: लवकरच येणार SBI म्युच्युअल फंडचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 1:09 PM

1 / 10
देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या SBI म्युच्युअल फंडचा IPO लवकरच येणार आहे. यासाठी कंपनीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
2 / 10
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची संयुक्त उद्यम म्युच्युअल फंड कंपनी SBI फंड्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड IPO आणून बाजारात सूचीबद्ध होणार आहे.
3 / 10
यासाठी सात गुंतवणूक बँकर्सचे सिंडिकेट निवडण्यात आले आहे. SBI म्युच्युअल फंड IPO च्या माध्यमातून बाजारातून एक अब्ज डॉलर म्हणजेच सूमारे 7500 कोटी रुपये उभारणार आहे.
4 / 10
SBI च्या बोर्डाच्या कार्यकारी समितीने SBI फंड्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमधील बँकेचा 6 टक्के हिस्सा IPO द्वारे सर्व नियामक मंजूरी मिळाल्यानंतर विकण्याची शक्यता तपासण्यासाठी मान्यता दिली आहे.
5 / 10
SBI ने त्यांच्या फंड्स मॅनेजमेंट कंपनीचा IPO आणण्याच्या शक्यतांबद्दल स्टॉक एक्सचेंजशी माहिती सामायिक केली आहे. SBI म्युच्युअल फंड हा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि फ्रान्सच्या अमुंडी अॅसेट मॅनेजमेंटचा संयुक्त उपक्रम आहे.
6 / 10
IPO द्वारे SBI 6 टक्के आणि Amundi Asset Management 4 टक्के विक्री करेल. तसेच, IPO च्या माध्यमातून एक अब्ज डॉलर्स उभारण्याची तयारी आहे.
7 / 10
असे मानले जात आहे की, IPO च्या माध्यमातून SBI म्युच्युअल फंड बाजारातून सुमारे एक अब्ज डॉलर्स उभे करू शकतो, त्यानंतर कंपनीला $7 बिलियनचे मूल्यांकन मिळण्याची अपेक्षा आहे.
8 / 10
SBI म्युच्युअल फंड ही देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे आणि स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, ती पाचवी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी बनेल.
9 / 10
सध्या HDFC AMC, UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट आणि आदित्य बिर्ला सन लाइफ AMC आधीच बाजारात सूचीबद्ध आहेत.
10 / 10
याआधी देशात कोरोनाने दस्तक देण्यापूर्वी, SBI ने त्यांची कार्ड कंपनी SBI Cards चा IPO आणला होता, ज्यातून सुमारे 10,500 कोटी रुपये जमा झाले होते.
टॅग्स :SBIएसबीआयIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग