sbi pension loan senior citizen get the loan with sms or missed call know here the scheme details
SBI : एक मिस्ड कॉल द्या, मिळवा १४ लाखांचं कर्ज; पाहा काय आहे ही योजना By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 3:01 PM1 / 20भारतीय स्टेट बँकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चांगली योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एका मिस्ड कॉलवर १४ लाखांपर्यंतच कर्ज मिळू शकणार आहे. 2 / 20या कर्जासाठी केवळ एक फोन कॉलच पुरेसा आहे. याव्यतिरिक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारेही कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो. 3 / 20जर ज्येष्ठ नागरिकांना कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना ७२०८९३३१४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर बँकेकडून ग्राहकांना कॉल केला जाईल आणि अर्जाची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. 4 / 20या पेन्शन लोनची एक विशेष बाब म्हणजे यामध्ये प्रोसेसिंग फीदेखील कमी आणि कागदपत्रेदेखील कमी द्यावी लागतील. याव्यतिरिक्त ग्राहकांना स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल.5 / 20स्टेट बँक ९.७५ ते १०.२५ टक्के व्याजदरानं कर्ज देणार आहे. परंतु यासाठी असलेली अट म्हणजे यासाठी पेन्शन खातेधारकाचं वय ७६ वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पेन्शन धारकांचं पेन्शन खातंही स्टेट बँकेत असणं आवश्यक आहे.6 / 20स्टेट बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार माहिती केंद्रातून याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी १८००११२२११ या क्रमांकावर कॉल करावा लागेल. 7 / 20तसंच ७२०८९३३१४५ या क्रमांकावर PERSONAL असं कॅपिटलमध्ये लिहून एसएमएद्वारेही माहिती मिळवता येईल. 8 / 20जर संबंधित खातेधारक हा केंद्र सरकारचा पेन्शनधारक असेल तर त्यांचं वय ७६ वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तसंत पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयसोबत मेंटेन असणंही अनिवार्य आहे. 9 / 20याव्यतिरिक्त पेन्शन धारकाला जोपर्यंत कर्जाचा कालावधी पूर्ण होणार नाही तोवर ट्रेजरीला दिलेल्या मँडेटमध्ये बदल केला जाणार नाही असंही लिखित स्वरूपात द्यावं लागेल. 10 / 20याव्यतिरिक्त ट्रेजरीलाहेदेखील लिखित स्वरूपात द्यावं लागेल की जर बँकेकडून एनओसी जारी केली नाही तर पेन्शनधारक पेन्शन पेमेंट कोणत्याही अन्य बँकेत ट्रान्सफर करण्याचं स्वीकारणार नाही. 11 / 20 डिफेन्स पेन्शनर्ससाठी किमान वय निर्धारित करण्यात आलं नाही. परंतु कर्ज घेताना त्यांचं वयदेखील ७६ पेक्षा अधिक असू नये अशी अट ठेवण्यात आली आहे. 12 / 20फॅमिली पेन्शनर्स अंतर्गत पेन्शनर्सचा मृत्यू झाला तर कुटुंबातील ज्या व्यक्तीला पेन्शन मिळत आहे त्याला ७६ वर्षांच्या वयापर्यंत कर्ज घेता येऊ शकेल. 13 / 20केंद्र आणि राज्य राज्य सरकारच्या पेन्शनर्सना वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत ६० महिन्यांसाठी १४ लाखांचं कर्ज, ७२-७२ वर्षांपर्यंत ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी १२ लाखांचं कर्ज आणि ७४-७६ वर्षांसाठी २४ महिन्यांच्या कालावाधीसह ७.५ लाख रूपयांचं कर्ज मिळणार आहे.14 / 20डिफेन्स पेन्शनर्ससाठी ५६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ८४ महिन्यांच्या कालावधीसाठी १४ लाख रूपये, ५८ ते ७२ वर्षांसाठी ६० महिन्यांच्या कालावधीसाठी १४ लाखांचं कर्ज, ७२-७४ या वर्षात ४८ महिन्यांच्या कालावधीसह १२ लाख रुपये आणि ७४ ते ७६ या कालावदीत २४ महिन्यांसाठी ७.५ लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे. 15 / 20फॅमिली पेन्सनर्सबाबात सांगायचं झालं तर त्यांना ७२ वर्षापर्यंत ६० महिन्यांच्या कालावधीसाठी ५ लाख रूपये, ७२-७४ या वर्षांमध्ये ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी ४.५ लाख रूपयांचं तर ७४ ते ७६ वर्षांपर्यंत २४ महिन्यांच्या कालावधीसाठी २.५ लाखांचं कर्ज देण्यात येईल. 16 / 20फॅमिली पेन्शनर्सच्या प्रकरणांमध्ये ईएमआय आणि नेट मंथली इन्कमचं प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.17 / 20अन्य सर्व प्रकारच्या पेन्शनर्ससाठी हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.18 / 20प्रीपेमेंट केल्यास रकमेच्या ३ टक्के चार्ज भरावा लागेल. परंतु त्या योजनेअंतर्गत नवं कर्ज घेतल्यास प्रीपेमेंट चार्ज द्यावा लागणार नाही.19 / 20ईएमआयची रक्कम ही पेन्शन खात्यातून डेबिट केली जाणार आहे.20 / 20पेन्शन लोन अंतर्गत गॅरेंटर कुचुंबवाती पेन्शनर्सच्या पात्र सदस्य किंवा कुटुंबातील कोणत्या अन्य सदस्याला बनवलं जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications