शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

State Bank आणि खासगी बँका CITI बँकेचा कार्ड व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 3:55 PM

1 / 15
अमेरिकेच्या प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या सिटी बँकेने (Citi bank) भारतातून गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. बँक भारतातील आपला कंझ्यूमर बँकिंग बिझनेस बंद करणार आहे. हा निर्णय जागतिक योजनेचा एक भाग असल्याचं बँकेनं म्हटलं होतं.
2 / 15
सिटी बँकेच्या कंझ्यूमर बिझनेसमध्ये क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, होम लोन आणि वेल्थ मॅनेजमेंटचा समावेश आहे. सिटी बँकेची देशभरात ३५ शाखा आहेत
3 / 15
तसेच कंझ्यूमर बिझनेसमध्ये जवळपास ४००० कर्मचारी कार्यरत आहेत. १३ देशांतून हा व्यवसाय बंद करण्यात येणार असल्याची माहिती बँकेनं यापूर्वी दिली होती.
4 / 15
या देशांमध्ये स्पर्धेचं वातावरण नसल्याचं सांगत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेन फ्रासर यांनी या क्षेत्रातून बँक गाशा गुंडळणार असल्याची माहिती दिली होती.
5 / 15
सध्यातरी ही घोषणा असून अद्याप बँकेने याबाबत काही हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतातून बाहेर पडण्यासाठी बँकेला नियामक मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता लागणार आहे.
6 / 15
सध्या सिटी बँक आपल्या व्यवसायाच्या खरेदीसाठी खरेदीदाराच्या शोधात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शर्यतीत भारतील अनेक बड्या बँकांसह सर्वात मोठी बँक स्टेट बँकही आहे
7 / 15
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार स्टेट बँकेची सबसिडायरी कंपनी एसबीआय कार्डची सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायावर नजर आहे
8 / 15
दरम्यान, या वृत्तानंतर स्टेट बँकेच्या शेअर्समध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली होती. बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल ७.५ टक्क्यांनी वाढ झाली होती
9 / 15
या क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्ड बिझनेसमधील सर्वात मोठी स्पर्धक बँक एचडीएफसी सध्या रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे नवे ग्राहक घेऊ शकत नाही. त्याचाच फायदा स्टेट बँकेला होणार असून ती सिटी बँकेच्या कार्ड व्यवसायाच्या खरेदीतील प्रमुख स्पर्धक मानली जात आहे.
10 / 15
सिटी बँक आपला व्यवसाय निरनिराळ्या खरेदीदारांना विकेल हे शक्य आहे, असं मत Macquarie Capital रिसर्च अॅनालिस्ट सुरेश यांनी व्यक्त केलं.
11 / 15
सिटी बँकेच्या कार्ड व्यवसायात अनेकांना रस आहे. यामध्ये आरबीएल, आयडीएफसी या बँकादेखील स्पर्धक मानल्या जात आहेत.
12 / 15
सिटी बँक भारतात नवीन नसून जवळपास ११९ वर्षांचा इतिहास आहे. सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर यांनी सांगितलं की, या घोषणेमुळे आमच्या सहकाऱ्यांवर तत्काळ कोणताही परिणाम होणार नाही.
13 / 15
सध्या सिटी बँक भारतातील मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम या ठिकाणांहून आपलं जागतिक कामही पाहत आहे.
14 / 15
आम्ही आमच्या ग्राहकांची सेवा करत राहणार आहोत. आजच्या घोषणेने बँकेची सेवा आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी नमूद केलं.
15 / 15
बँकेने १९०२ मध्ये भारतात प्रवेश केला होता. १९८५ मध्ये कंझ्यूमर बँकिंग बिझनेस सुरु केला होता.
टॅग्स :bankबँकIndiaभारतState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया