शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाग्रस्तांना SBI मधून मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत Personal Loan, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 6:13 PM

1 / 8
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना स्वस्तात पाच लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan)काढता येईल. देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने असा निर्णय घेतला आहे.
2 / 8
बँकेने या कर्ज सेवेला कोविड पर्सनल लोन (Covid Personal Loan) असे नाव दिले आहे. या कर्जाची विशेष बाब म्हणजे याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी देण्याची आवश्यकता नाही.
3 / 8
कोरोनाच्या संकटकाळात उपचार करण्यासाठी कुणालाही पैशांची चणचण भासू नये, याकरता एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते पगारदार, पगार नसणारे आणि निवृत्तीवेतनधारकांना कोरोना उपचारांसाठी 25000 ते पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.
4 / 8
बँक ग्राहकांना हे कर्ज चुकवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी देत आहे. या कर्जावर तुम्हाला 8.5 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. शिवाय, अनसिक्योर्ड वैयक्तिक कर्जाचे दर 10 ते 16 टक्क्यांपर्यंत आहेत.
5 / 8
एसबीआय प्रमुख दिनेश खारा आणि इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन राज किरण राय यांची रविवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ज्यामध्ये या कोविड पर्सनल लोन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
6 / 8
कोविड पर्सनल लोनला पब्लिक सेक्टर बँकांच्या बोर्डाकडून याआधीच मंजुरी मिळाली आहे. हे कर्ज पगारदार आणि पगार नसरणाऱ्या अशा दोन्ही गटातील व्यक्तींना मिळेल.
7 / 8
तुम्ही हॉस्पिटल बिल बँकेमध्ये दाखवून हे कर्ज घेई शकता. तुमच्या पेमेंटची स्थिती आणि क्षमता लक्षात घेऊन बँक तुम्हाला कर्ज देईल. या व्यतिरिक्त तुम्ही कोरोना रूग्णाच्या उपचार खर्चाची अंदाजे रक्कम देऊनही या सुविधेचा लाभ घेऊ शकता, जी बँकेत घेऊन जावी लागेल आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
8 / 8
यात बँका 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्ज देऊ शकतात. कर्जासाठी मान्यता आणि ते नाकारण्याचा अधिकार बँकेकडे असेल.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआयcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसbankबँकbusinessव्यवसाय