शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI कडून जेष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत 'या' योजनेमध्ये करू शकतात गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 2:22 PM

1 / 9
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (State Bank of India) ने ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेची मुदत (Special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे.
2 / 9
मे महिन्यात, बँकेने एसबीआय विकेअर (SBI WECARE) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ही योजना डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, जी पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली.
3 / 9
आता ती तिसऱ्यांदा 30 जून 2021 करण्यात आली आहे. कोरोनो व्हायरस साथीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याज दरासाठी विशेष एफडी योजना सुरू केली गेली.
4 / 9
बँकेने विशेष एफडी योजना तीन महिन्यांसाठी 30 जूनपर्यंत वाढवली आहे. विशेष एसबीआय विकेअर डिपॉझिट (SBI Wecare Deposit) योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते.
5 / 9
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 टक्के जादा व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 टक्के जादा व्याज देत आहे.
6 / 9
अशा प्रकारे, एसबीआय विकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50+0.30) टक्के अधिक व्याज घेऊ शकतात.
7 / 9
60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे. मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
8 / 9
एसबीआय विकेअर ठेवीअंतर्गत नवीन एफडी खाते उघडणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोन्ही बाबींवर जास्त व्याजाचा लाभ मिळू शकेल. एसबीआयची ही योजना आता 30 जून 2021 पर्यंत खुली आहे.
9 / 9
एसबीआय सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.4 टक्के व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर एफडीला लागू असणारा व्याज दर 6.20 टक्के असेल.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआयbankबँकMONEYपैसाbusinessव्यवसाय