शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI Vs Post Office : मंथली इन्कम स्कीमवर कोण देतंय अधिक व्याज, एसबीआय की पोस्ट ऑफिस; पाहा काय आहे फायद्याचं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 3:13 PM

1 / 10
Monthly Income Scheme : मंथली इन्कम प्लॅन स्कीम गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखमीशिवाय नियमित मासिक उत्पन्नाची हमी देते. या योजना ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. कारण या योजना त्यांना नियमितपणे कमावण्याची संधी देतात.
2 / 10
या स्कीममध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या देय तारखेला कमाई म्हणून व्याजाचे पैसे मिळतात. येथे आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक योजना आणि एसबीआयच्या मासिक योजनेबद्दल सांगत आहोत, दोन्हीचे फायदे आणि तोटे काय आहेत.
3 / 10
SBI ची एन्युटी डिपॉझिट स्कीम (Deposit Schemes) ही बँकेच्या सर्वात खास डिपॉझिट स्कीम्सपैकी एक आहे. SBI च्या योजनेंतर्गत ग्राहकांना एकाच वेळी सर्व पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर काही महिन्यांनी बँक तुम्हाला दर महिन्याला पैसे देते. बँक मुद्दलावरील व्याजदराची (Rate of Interest) गणना करते. या योजनेत ग्राहकांना मिळणारे व्याज तीन महिन्यांच्या चक्रवाढ (Rate of Interest on Compounding) दरावर मोजले जाते.
4 / 10
अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीची वेळ मर्यादा वेगळी आहे. तुम्ही ३६ महिने, ६० महिने, ८४ महिने आणि १२० महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. SBI च्या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
5 / 10
परंतु या स्कीममध्ये गुंतवणूक (Annuity Deposit Scheme) करायची असल्यास तुम्हाला किमान १ हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुक (Universal Passbook) मिळते. १८ वर्षांखालील लोकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. हे खाते एकट्याने किंवा संयुक्तपणे उघडता येते.
6 / 10
SBI च्या योजनेत, जर गुंतवणूकदाराला दरमहा जर १० हजारांचे मासिक उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांना सुमारे ५ लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्हाला ५.४५ टक्के ते ५.५० टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना ५.९५ टक्के ते ६.३० टक्के व्याज मिळते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे.
7 / 10
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) ही एक सरकारी लहान बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते. पोस्ट ऑफिस योजनेत कोणताही धोका होणार नाही. पाहुया या स्कीममध्ये किती व्याज मिळतं.
8 / 10
योजनेंतर्गत, एकल किंवा संयुक्त खात्यात पैसे जमा केले जातात. वार्षिक व्याज जमा झाल्यानंतर, ती रक्कम दरमहा खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. मग ते आणखी ५-५ वर्षांनी वाढवले जाऊ शकते. मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाईल आणि पैसे त्यांच्या नॉमिनीला दिले जातील.
9 / 10
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये जॉईंट अकांऊटमध्ये ९ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला ६.६ टक्के दराने ५९,४०० रुपये मिळतील. या अर्थाने, तुमच्या मासिक व्याजाची रक्कम ४,९५० रुपये येते. तुम्ही ते दर महिन्याला घेऊ शकता. ही फक्त व्याजाची रक्कम आहे, तुमची मूळ रक्कम तशीच राहील.
10 / 10
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमअंतर्गत सिंगल किंवा जॉईंट अकाऊंट उघडलं जाऊ शकतं. यामध्ये तुम्ही एका खात्यासाठी कमाल ४.५ लाख रुपये आणि जॉईंट अकांऊटसाठी जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत खाते उघडू शकते.
टॅग्स :SBIएसबीआयPost Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक