तुमची एक चूक आयुष्यभराची कमाई घालवू शकते; सायबर गुन्हेगारांच्या 'या' ट्रॅपपासून कसं राहायचं दूर? By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:57 PM
1 / 6 देशात झपाट्याने डिजिटल प्रगती होत आहे. सर्व गोष्टी हातातल्या मोबाईलवरुन होत आहेत. स्मार्टफोन फक्त संपर्क किंवा मनोरंजनाचं साधन राहिलं नसून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहारही होत आहेत. पण, या फायद्यांसोबत एक धोकाही सातत्याने वाढत आहे. देशात सायबर गुन्हेगारी अजगरासारखी पसरत चालली आहे. 2 / 6 विविध उपाययोजना करुनही सायबर फसवणुकीची प्रकरणे थांबायचं नाव घेत नाही. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचा सोपा उपाय म्हणजे सावधगिरी. 3 / 6 सायबर गुन्हेगार कॉल करुन पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यावर काही गंभीर गुन्हे दाखल झाले असून मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. हे लोक तुम्ही डिजिटल अरेस्ट असून कुणाशीही संपर्क करू नये अशी धमकी देतात. तुम्हाला असा कोणताही कॉल आल्यास सावध रहा आणि फोन ताबडतोब डिस्कनेक्ट करा. 4 / 6 शेअर मार्केटमधून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामटे तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवू शकतात. तुम्हाला बनावट वेबसाइटची लिंक पाठवून त्यावर लॉगइन करण्यास सांगितले जाते. या वेबसाइटवर बनावट पोर्टफोलिओ दाखवले जातात. भरघोस नफा पाहून लोक भाळतात स्वतःची फसवणूक करुन घेतात. 5 / 6 ऑनलाइन टास्क देऊन तात्काळ दीडशे दोनशे रुपये तुमच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. जर कोणी तुम्हाला व्हिडिओ शेअर-लाइक करून किंवा एखाद्या रिव्ह्यू देऊन पैसे कमवण्याचं प्रलोभन दाखवत असेल, तर समजून घ्या की पुढे धोका आहे. 6 / 6 या फसवणुकीत, गुन्हेगार तुम्हाला कॉल करुन सांगतात की विमानतळावरील कस्टम विभागाने तुमच्या नावाने येणारे एक पार्सल अडवले आहे ज्यामध्ये ड्रग्ज, शस्त्रास्त्रे यासारख्या प्रतिबंधित वस्तू सापडल्या आहेत. गुन्हेगार विविध प्रकारच्या धमक्या देऊन तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रयत्न करू शकतात. आणखी वाचा